AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आज रात्री आम्ही निवांत झोपू..”, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफने सांगितलं आतापर्यंतचं दु:ख

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादला पराभवाचं पाणी पाजलं. सलग पराभवानंतर आरसीबीची गाडी रुळावरून उतरली होती. त्यामुळे संघातील आत्मविश्वासही कमी झाला होता. अखेर आरसीबीने स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे. या विजयानंतर आरसीबीचा कर्णधार फाफने आपलं मनातलं बोलून दाखवलं आहे.

आज रात्री आम्ही निवांत झोपू.., रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफने सांगितलं आतापर्यंतचं दु:ख
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 26, 2024 | 12:04 AM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सात पराभवानंतर विजयाची चव चाखायला मिळाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केलं होतं. त्यानंतर पंजाबला पराभूत करण्यात आरसीबीला यश आलं होतं. मात्र त्यानंतर सलग 7 पराभव सहन करावे लागले. काही सामन्यातील विजय हातातोंडाशी येऊन गेला. यामुळे आरसीबीचं प्लेऑफमधील स्थान डळमळीत झालं आहे. पण गणिती भाषेत काही अंशी आशा जिवंत आहेत. त्यामुळे आता उर्वरित प्रत्येक सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. याची जाणीव आरसीबी संघातील प्रत्येक खेळाडूला आहे. आरसीबीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 207 धावांच आव्हान ठेवलं. मात्र सनरायझर्स हैदराबादचा संघ 171 धावाच करू शकला. बंगळुरुने हैदराबादला 35 धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर आरसीबीच्या गोटात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलं आहे. या सामन्यातील विजयानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आपलं मन मोकळं केलं आहे.

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला की, “गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही चुरशीचा लढा दिला. हैदराबादने 270 प्लस धावा केल्या होत्या, त्या बदल्यात आम्ही 260 धावा केल्या. कोलकात्याविरुद्धचा सामना अवघ्या एका धावेने गमावला. आम्हाला निसटता पराभव सहन करावा लागला. पण संघाला आत्मविश्वास मिळविण्यासाठी सामने जिंकणे आवश्यक आहे. आज रात्री चांगली झोप लागेल.संघाला खोटा आत्मविश्वास देऊ शकत नाही. आत्मविश्वास देणारी एकमेव गोष्ट म्हणजे कामगिरी.”

“स्पर्धा खूपच चुरशीची आहे, संघ इतके मजबूत आहेत की तुम्ही 100 टक्के नसल्यास पराभव होईल. आता संघात इतरही धावा करत आहेत. स्पर्धेच्या पहिल्या हाफमध्ये फक्त विराट धावा करत होता. आता ग्रीनने धावा काढणे त्याच्यासाठी आनंदाची बाब आहे. आम्हाला माहित आहे की चिन्नास्वामी आमच्यासाठी खूपच अवघड आहे. बॉलिंग करणे अवघड आहे. आम्ही त्याची रेसिपी शोधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ते कठीण आहे.”, असं आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.