नवरा गडगंज श्रीमंत असूनही भाड्याच्या घरात राहते विद्या बालन, महिन्याला देते इतकं भाडं

Vidya Balan: '25 घर पाहिल्यानंतर देखील मुंबईत...', नवरा गडगंज श्रीमंत असूनही का भाड्याच्या घरात राहते विद्या बालन? मुंबईत स्वतःचं घर असण्याबाबत अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विद्या बालन हिची चर्चा...

नवरा गडगंज श्रीमंत असूनही भाड्याच्या घरात राहते विद्या बालन, महिन्याला देते इतकं भाडं
| Updated on: Sep 28, 2024 | 8:24 AM

अभिनेत्री विद्या बालन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. विद्या फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःच्या आणि भाड्याच्या घराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नवरा गडगंज श्रीमंत असताना देखील अभिनेत्री भाड्याच्या घरात राहते. यावर अभिनेत्री मोठं वक्तव्य केलं आहे. विद्या बालन हिच्या पतीचं नाव सिद्धार्थ रॉय कपूर असं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत विद्या बालन ड्रीम होमबद्दल म्हणाली, ‘मुंबईत स्वतःच्या स्वप्नांमधील घर खरेदी करणं म्हणजे ‘किस्मत कनेक्शन’ सारखी भावना आहे. परफेक्ट घर कधीच तुमच्या नशीबात नसतं. जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता आणि तेव्हा तुम्हाला समाधान मिळतं, की हेच माझं घर आहे…’

’15 वर्षांपूर्वी मी माझ्या आईसोबत मुंबईत घर शोधत होती आणि आज देखील घर शोधत आहे. मला माझ्या स्वप्नांमधील घर मिळालं होतं. पण ते माझ्या बजेटमध्ये नव्हतं. लग्नानंतर मी सिद्धार्थ सोबत घर पाहायला सुरुवात केली. 25 घर सिद्धार्थ आणि मी पाहिले. पण एकही आम्हाला आवडला नाही. एक घर आम्हाला आवडलं. पण ते घर आम्हाला भाड्याने मिळत होतं.’

 

 

‘भाड्याच्या घरात मी कधीच राहिली नव्हती आणि मला आवडत देखील नाही. पण अनेक ठिकाणी फिरल्यानंतर घर भाड्याने घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. कारण मुंबईत गार्डन आणि सी व्ह्यू असलंले घर नशिबाने मिळतं. आमचा घर मालक देखील आमच्यावर आनंदी असतो. कारण त्याला महिन्याला आम्ही मोठ्या रकमेचा चेक देतो…’ असं खुद्द विद्या हिने मुलाखतीत सांगितलं.

 

 

विद्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय दिसत नाही. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.