आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून विजय सेतूपति एक्झिट, काय आहे कारण पाहा

| Updated on: Feb 13, 2021 | 3:16 PM

आमिर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' (Lal Singh Chaddha) गेल्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे.

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटातून विजय सेतूपति एक्झिट, काय आहे कारण पाहा
Follow us on

मुंबई : आमिर खानचा (Aamir Khan) आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) गेल्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात करिना कपूर खान आमिर खानसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की, दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतिही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे पण नंतर तारखांमुळे त्याने हा चित्रपट सोडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता अजून एक कारण पुढे आले आहे. (Vijay Sethupati exits from Aamir Khan’s ‘Lal Singh Chaddha’)

रिपोर्टनुसार आमिर आणि विजय सेतूपति यांच्यात सर्व काही ठीक नव्हते. विजय सेतूपतिच्या वाढलेल्या वजनामुळे आमिर खान चिडला होता. यानंतरच विजय सेतूपतिने ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सोडला आहे. ही बातमी समजल्यानंतर आमिर खानने ‘विक्रम वेध’ चा हिंदी रिमेक करण्यास नकार दिला. खरं तर विजय सेतूपतिने मूळ चित्रपटात जी भूमिका साकारली होती ती आमिरला नकोशी होती.

एक काळ आमिर खानच्या जीवनात होत होता की, त्याला वाटत होतं की त्याचं करिअर बरबाद होत चाललंय. या चिंतेत तो रोज घरात बसून रडायचा. याबाबत स्वतः आमिरनेच खुलासा केला होता. बेनेट युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांशी बोलताना आमिरने त्याचं करिअर आणि त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या.

आमिर म्हणाला होता की, ‘माझं करिअर कधीच सोपं नव्हतं. मी माझ्या करिअरकडे पाहून खूप दुःखी व्हायचो, मला वाटायचं की माझं करिअर आता संपतंय. मी घरात बसून खूप रडायचो’.आमिर त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल एक आठवण सांगताना म्हणाला होता की, “कयामत से कयामत तक हा चित्रपट यशस्वी झाला. त्यानंतर मी लागोपाठ 8-9 चित्रपट साईन केले. त्यावेळी सगळेच दिग्दर्शक माझ्यासाठी नवीन आणि अनोळखी होते.

संबंधित बातम्या : 

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

दीपिका पादुकोणचा पारा चढला, नेटकऱ्याने ट्रोल करताना वापरली शिवी आणि…

मॉडल रेबेका लँड्रिथची निर्घृण हत्या, गळा, डोके आणि छातीवर 18 गोळ्या झाडल्या, मारेकऱ्यांकडून मृतदेहाची विटंबना

(Vijay Sethupati exits from Aamir Khan’s ‘Lal Singh Chaddha’)