थलपती विजय CM होताच कथित GF त्रिशा कृष्णनची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाली..

Trisha Krishnan on CM Vijay Oath Ceremony : अभिनेते विजय थलपती यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हातात घेतली. नुकताच शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात सर्वांच्या नजरा या विजय थलपती यांची कथित गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णन हिच्याकडे होत्या. यादरम्यान तिने पहिली प्रतिक्रिया दिली.

थलपती विजय CM होताच कथित GF त्रिशा कृष्णनची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाली..
Vijay Thalapathy and Trisha Krishnan
| Updated on: May 10, 2026 | 12:25 PM

तामिळनाडूमध्ये मोठे सत्तापरिवर्तन झाले. अभिनेते विजय थलपती यांनी थेट राजकारणात प्रवेश केला आणि तामिळनाडू विधानसभेत त्यांच्या पक्षाची धमाकेदार कामगिरी ठरली. काही दिवसांपूर्वीच पक्षाची स्थापना विजय थलपती यांच्याकडून करण्यात आली आणि विधानसभेची निवडणूक लढवली. जनतेने विजय थलपती यांच्या पक्षाला जोरदार प्रतिसाद देत मतदान केले. आज सकाळी विजय थलपती यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याकडे देशाच्या नजरा होत्या. कोणीही विचार करणार नाही, अशी धमाकेदार कामगिरी विजय थलपती यांच्या पक्षाने केली. हा तामिळनाडूकरांसाठी अत्यंत खास दिवस आहे. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कोणी विचारही केला नाही असा ऐतिहासिक विजय थलपती यांच्या पक्षाने मिळवला. ज्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला.

या शपथविधी सोहळ्याला विजय थलपती यांची कथित गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णन उपस्थित होती. विजय थलपती आणि त्याच्या पत्नीचे घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात सुरू आहे. या शपथविधीकडे त्याची पत्नी आणि मुलांनी पाठ फिरवली. मात्र, कथित गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णन उपस्थित होती. या शपथविधी सोहळ्यादरम्यानच आता त्रिशा कृष्णन हिची प्रतिक्रिया पुढे आली.

शपथविधीसोहळ्यादरम्यान माध्यमांनी त्रिशा कृष्णनला काही प्रश्न विचारली. त्रिशा कृष्णनला विचारण्यात आले की, आजच्या या मोठ्या दिवशी तुम्हाला नक्की कसे वाटते? यावर बोलताना त्रिशा कृष्णनने चेहऱ्यावर हास्य बघायला मिळाले. तिने म्हटले की, धन्यवाद.. मी उत्सुकतेने वाट पाहत आहे.. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या शपथविधी सोहळ्याकरिता त्रिशा कृष्णन प्रमुख पाहुण्यांपैकी एक होती.

विशेष म्हणजे ज्यावेळी तामिळनाडू विधानसभेचे निकाल पुढे येत होते, त्यावेळी विजय थलपती यांना भेटण्यासाठी त्रिशा कृष्णन घरी पोहोचली होती. त्रिशा कृष्णन या शपथविधी सोहळ्याकरिता खास लूकमध्ये पोहोचली होती. त्रिशा कृष्णन हिच्या लूकची जोरदार चर्चा रंगताना बघायला मिळत आहे. यावेळी विजय थलपती यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याकरिता राहुल गांधी यांचीही प्रमुख उपस्थित होती. या शपथविधी सोहळ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Follow Us