Vivek Oberoi : ऐश्वर्यावरुन सलमान खानशी घेतलेला पंगा, आता विवेक ओबेरॉयचा यु-टर्न, भाईजानला केला सपोर्ट

Vivek Oberoi On Salman Khan : विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात ऐश्वर्या रायमुळे वादाची ठिणगी उडालेली. त्यानंतर आता 23 वर्षांनी अभिनेत्यानं भाईजानला पाठिंबा दिला आहे.

Vivek Oberoi : ऐश्वर्यावरुन सलमान खानशी घेतलेला पंगा, आता विवेक ओबेरॉयचा यु-टर्न, भाईजानला केला सपोर्ट
| Updated on: Nov 28, 2026 | 5:44 PM

सुपरस्टार सलमान खान त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत असून हा सिनेमा 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अभिनेता विवेक ओबेरॉयने या चित्रपटाबद्दल आपले विचार मांडले आहेत. अभिनेत्यानं सांगितलं की, जेव्हा भारतीय लष्कराच्या शौर्य, धाडस आणि धैर्यावर आधारित चित्रपटाचा विषय येतो, तेव्हा प्रेक्षकांनी पुढे येऊन सिनेमाला पाठिंबा दिला पाहिजे. विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात वैर होतं. त्यानंतर आता अभिनेत्यानं सलमान खानच्या सिनेमाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

विवेक ओबेरॉय काय म्हणाला?

Loading...

विवेक ओबेरॉय म्हणाला की, भारतीय लष्कराच्या शौर्य आणि धैर्यावर आधारित कोणत्याही चित्रपटाला आपण प्रेक्षकांनी पाठिंबा दिला पाहिजे. अशा चित्रपटांना प्रचंड प्रेम मिळायला हवं. आपल्या बंधू-भगिनींबद्दल आदर निर्माण करणारा कोणताही चित्रपट यशस्वी झाला पाहिजे. पुढे विवेकनं चित्रपटाचे दिग्दर्शक, अपूर्व लाखिया यांचाही उल्लेख केला. त्यानं सांगितलं की अपूर्व त्याचा मित्र आहे आणि त्यानं यापूर्वी ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’मध्ये त्याच्यासोबत काम केलं आहे. विवेकनं अपूर्वला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाला की, ‘देव त्याचं भलं करो आणि हा चित्रपट लोकांना प्रेरणा देईल.’

काय घडलेलं नेमकं?

बॉलिवूडमध्ये प्रेमप्रकरणांमुळे अनेकदा कलाकारांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतं. असाच एक गाजलेला वाद म्हणजे अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील भांडण. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनमुळे या दोघांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. 2003 मध्ये विवेकनं पत्रकार परिषद घेत सलमानवर गंभीर आरोप केले होते. २००२ च्या आसपास सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय एकमेकांच्या जवळ आल्याच्या बातम्या समोर आल्या. यामुळे सलमान आणि विवेक यांच्यात वादाची ठिणगी उडाली.

1 एप्रिल 2003 रोजी विवेक ओबेरॉयनं मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं सलमान खानवर गंभीर आरोप केले. विवेकच्या दाव्यानुसार, २९ मार्चच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत सलमाननं त्याला ४१ वेळा फोन केला होता. या फोन कॉल्सदरम्यान शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप विवेकने केला होता. विवेकच्या पत्रकार परिषदेनंतर सलमान खाननं हे आरोप फेटाळून लावले होते. आपण विवेकला ४१ वेळा फोन केला नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं. या प्रकरणामुळे दोन्ही अभिनेत्यांमधील वाद अधिकच चर्चेत आला. या वादानंतर विवेक ओबेरॉयच्या करिअरवर परिणाम झाला. २०२३ मध्ये एका मुलाखतीत विवेकनं बॉलिवूडमधील लॉबिंग आणि दबावाच्या राजकारणाबद्दल भाष्य केलं होतं. या संपूर्ण अनुभवामुळे आपण मानसिकदृष्ट्या खूप थकलो होतो आणि काही काळ कामापासून दूर राहावं लागलं, असं त्यानं सांगितलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us