AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Price Surge : दोन दिवसात सराफा बाजारात मोठी खळबळ, सोनं 4200 ने महागलं, तर चांदी…? 5 कारणांनी फोडला घाम

गेल्या दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. सोनं प्रति 10 ग्रॅम 4200 ने, तर चांदी प्रति किलो 10,000 हून अधिक महागली आहे. अमेरिकन डॉलरची घसरण, लग्नसराईची मागणी, आणि शॉर्ट कव्हरिंग यामुळे ही तेजी आली आहे. गुंतवणूकदारांसाठी खरेदीची संधी मानली जात आहे, तरीही दर अजूनही विक्रमी उच्चांकापेक्षा खाली आहेत.

Gold-Silver Price Surge : दोन दिवसात सराफा बाजारात मोठी खळबळ, सोनं 4200 ने महागलं, तर चांदी...? 5 कारणांनी फोडला घाम
Gold-Silver Price SurgeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 5:41 PM
Share

गेल्या दोन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. सोन्या चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत होती, त्याला अखेर ब्रेक लागला आहे. गुरुवार आणि शुक्रवारी सोन्या आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. या दोन दिवसात सोनं प्रति 10 ग्रॅम 4 हजार आणि चांदी प्रति किलो 10000 रुपयांनी महागली आहे. अमेरिकन डॉलरच्या किंमती घसरल्या असून शॉर्ट कव्हरिंगमुळे सोनं आणि चांदी महागली आहे.

एमसीएक्सवर 25 नोव्हेंबर रोजी डिसेंबर डिलिव्हरीवालं सोनं प्रति 10 ग्रॅम 1,21,137 रुपयांवर बंद झालं. दुसऱ्या दिवशी 26 नोव्हेंबर रोजी ही तेजी कायम राहिली अन् बाजार 1,22,740 रुपयांवर उघडला. काल म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी सोनं 1,25,350 रुपयांवर क्लोज झालं. म्हणजे गेल्या दोन दिवसात सोन्याचा भाव 4,213 रुपयाने वाढला असून गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चांदी किती महागली?

दोन दिवसात चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. 25 नोव्हेंबर रोजी डिसेंबर डिलिव्हरीवाली चांदी प्रतिकिलो 1,42,517 रुपयांवर बंद झाली. दुसऱ्या दिवशी 26 नोव्हेंबर रोजी चांदी 1,45,800 रुपयांवर ओपन झाली. काल शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी चांदी 1,52,843 रुपयांवर क्लोज झाली. म्हणजे गेल्या दोन दिवसात चांदीचा भाव 10,326 रुपये प्रति किलो वाढला असून चांदीच्या भावात दोन दिवसात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑल टाइम हाय पेक्षा खाली

सोनं आणि चांदीचा भाव आपल्या सर्वकालीन उच्चांकाहून खाली आला आहे. या वर्षी जानेवारीच्या अखेरीच एमसीएक्सवर सोनं 1.80 लाख रुपयांवर गेलं होतं. यापूर्वी सोनं 1.25 लाखावर होतं. अशावेळी सोन्याच्या भावात 10 महिन्यात 55 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोनं आपल्या ऑल टाइम हायवरून 30 टक्क्याने खाली आलं आहे. तशाच प्रकारे चांदी आपल्या ऑल टाइम हाय 4.20 लाख रुपयाने घसरून सुमारे 1.53 लाख रुपयांवर आली आहे. अशावेळी चांदी 2.67 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. म्हणजे 63 टक्क्याने घसरली आहे.

दर वाढण्याची पाच कारणं

25 नोव्हेंबर रोजी सोनं घसरून 1.21 लाख रुपये आणि चांदी 1.43 लाख रुपयांवर आली आहे. उच्चांकावरून ही घसरण आल्याने गुंतवणूकदारांसाठी खरेदीची ही चांगली संधी आहे. त्यामुळेच बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे.

देशात लग्नाचा सीजन सुरू आहे. त्यामुळे लोकांचा कल सोनं आणि चांदी खरेदी करण्यावर अधिक आहे. ज्वेलरी बाजारात सोन्या चांदीची मागणी वाढली आहे.

अमेरिकन डॉलरचे मूल्य घसरले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत. डॉलरच मूल्य घसरल्यावर दुसऱ्या करन्सीत खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या किंमती अपेक्षेपेक्षा स्वस्त होतात. त्यामुळे त्याची मागणी वाढते.

सातत्याने घसरण होत असल्याने अनेक ट्रेडर्सने किंमत आणखी घसरण्याची शक्यता असल्याने सोन्याची विक्री केली होती. आता बाजारात सुधारणा झाल्याने ते चार्ट पोझिशन बंद करत आहेत. त्यासाठी करण्यात येत असलेल्या खरेदीने सोन्याला अतिरिक्त मजबुती आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड सुमारे 1.6% आणि चांदी सुमारे 4.6% टक्क्याने वाढली आहे. त्याशिवाय अमेरिकन शेअर बाजारात टेक्नॉलॉजी आणइ एआय कंपन्यांच्या शेअरमध्ये स्थैर्य आल्याने सोनं चांदी विकण्याचा दबाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या रिकव्हरीचा परिणाम देशी बाजारांवर झाला आहे.

Follow Us
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन