
मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमागिरी करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा पूर्णपणे फेल ठरला आहे, ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमाच्या तुलनेत ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद फार कमी आहे. रिपोर्टनुसार, ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाने आतापर्यंत २ कोटी रुपायांचा गल्ला देखील जमा केलेला नाही. ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाला अनेकांनी विरोध दर्शवला पण अभिनेत्री कंगना रनौत मात्र विवेक यांच्या बाजूने उभी राहिली. पण कंगना रानौत हिने विवेक अग्निहोत्री यांचं कौतुक केल्यामुळे एक महिला संतापली आहे. सध्या महिलेचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. एवढंच नाही तर, सिनेमाबद्दल अनेक गोष्टी देखील समोर येत आहेत. यावर कंगना म्हणाली, ‘तुम्ही एखाद्या सिनेमाबद्दल एवढं वाईट कसं बोलू शकता? फक्त पैसा म्हणजे यश आहे का? तुम्ही प्रत्येक कलाकाराला अशा प्रकारे अपमानित का करता? प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये ‘द व्हॅक्सिन वॉर’ उत्तम सिनेमा आहे. चांगल्या प्रकारे साकारण्यात आलेला सिनेमा यश नाही का?
Don’t support him my love. Nobody can be more nasty than Vivek Agnihotri. He drunk abused me. He’s far from being an artist.
See what he said about @iamsrk also.
He doesn’t need any empathy especially from a straight shooter like you. https://t.co/ukOoxzqCCx— Seetu Mahajan Kohli (@kohliseetu) September 30, 2023
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येत व्यवसायात यश मिळतं का? काही प्रयत्न यशस्वी होतात, तर काही अपयशी ठरतात. घरी बसलेल्या व्यक्तीला सिनेमांबद्दल काही माहिती आहे का? इतकं वाईट, क्रूर आणि टीका करण्याचं साहस कसं येत?’ असं देखील कंगना म्हणाली. तर अभिनेत्रीच्या वक्तव्यावर एका महिलेने नाराजी व्यक्त केली आहे..
महिला म्हणाली, ‘ विवेक अग्निहोत्री यांना पाठिंबा देवू नको.. विवेक अग्निहोत्री यांच्यापेक्षा वाईट दुसरं कोणी असू शकत नाही. त्यांनी नशेत माझ्यासोबत गैरवर्तन केलं. ते कलाकार नाहीत… त्यांनी शाहरुख खान याच्याबद्दल देखील अनेक वाईट गोष्टी केल्या आहेत. ‘
महिलेच्या ट्विटला उत्तर देताना कंगनाने लिहिले की, “मी प्रत्येकासाठी उभी आहे.आहे. ज्यांनी मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या हितासाठी देखील सर्व काही करण्यासाठी तरी तयार आहे…’ महिलेच्या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.