Armaan Malik Volgs | अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने ट्रोल करणाऱ्यांना फटकारले, पायलने थेट केला अत्यंत मोठा खुलासा

यूट्यूबर अरमान मलिक याने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. अरमान मलिक याची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी नेहमीच चर्चेत असतात. त्याही सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

Armaan Malik Volgs | अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने ट्रोल करणाऱ्यांना फटकारले, पायलने थेट केला अत्यंत मोठा खुलासा
| Updated on: Jun 17, 2023 | 6:01 PM

मुंबई : यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) आणि त्याच्या दोन्ही पत्नी या नेहमीच चर्चेत असतात. ब्लाॅगच्या माध्यमातून मलिक कुटुंबिय त्यांच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे हे सांगताना कायमच दिसते. इतकेच नाही तर यूट्यूबर अरमान मलिक नेहमीच गाण्याच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे तूफान मनोरंजन (Entertainment) करताना देखील दिसतो. विशेष म्हणजे अरमान मलिक असो किंवा त्याची पहिली पत्नी पायल आणि दुसरी पत्नी कृतिका यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून करोडो रूपयांची कमाई मलिक कुटुंबिय करते. अरमान मलिक याच्या अनेक नातेवाईकांचे देखील चॅनल आहेत.

अरमान मलिक याची बहीण सपना ही गेल्या काही दिवसांपासून सतत मोठे खुलासे करताना दिसत आहे. सपना हिने धक्कादायक खुलासे केले आहेत. सध्या मलिक कुटुंबिय आणि सपना यांच्यामध्ये मोठा वाद हा बघायला मिळतोय. सपना हिचे आरोप ऐकून अनेकांनी थेट पायल आणि कृतिका यांच्या लेकरांना टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.

काही दिवसांपूर्वीच कृतिका हिने एका बाळाला जन्म दिलाय. कृतिका हिला मुलगा झाला असून त्याचे नाव जैद ठेवण्यात आले आले. पायल हिने देखील काही दिवसांपूर्वीच दोन जुळ्या बाळांना जन्म दिलाय. पायल हिच्या मुलीचे नाव तुबा तर मुलाचे नाव अयान ठेवले आहे. पायल हिचे हे दोन्ही बाळ नसल्याचा सतत दावा केला जात आहे.

शेवटी या चर्चांना कंटाळून पायल आणि कृतिका यांनी एक व्हिडीओ तयार करत थेट आपले पोट दाखवले आहे. यामध्ये पायल हिने थेट तिचे डिलीवरीमध्ये तिच्या पोटाला टाकलेले टाके देखील लोकांना दाखवले आहेत. कारण बरेच लोक पायल हिचे ते दोन बाळ नसल्याचा सतत दावा करताना दिसले आहेत. या ब्लाॅगमध्ये लोकांचा चांगलाच समाचार देखील घेतलाय. कृतिका हिने देखील आपले पोट या व्हिडीओमध्ये दाखवल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये पायल हिने सांगितले की, माझ्या गर्भधारणेच्या सुरूवातीपासूनच मी सतत लोकांना माहिती देत आहे. तरीही लोक तुबा आणि अयान हे माझे बाळ नसल्याचा दावा करत आहेत. पायल हिने थेट म्हटले की, हाॅस्पीटलमध्ये जा आणि तेथील डाॅक्टरांकडून सर्व माहिती घ्या. या व्हिडीओमध्ये पायल मलिक ही रडताना देखील दिसत आहे. व्हिडीओत पायल हिच्यासोबत कृतिका देखील दिसत आहे.