
ओटीटी एक असं प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही एकापेक्षा एक दमदार चित्रपट आणि वेब सीरिज सहजरित्या पाहू शकता. ओटीटीवर हॉरर थ्रिलर वेब सीरिज किंवा चित्रपटांना चाहत्यांकडून दमदार प्रतिसाद मिळतो. अशीच एक हॉरर थ्रिलर वेब सीरिज नुकतीच ओटीटीवर स्ट्रीम झाली आहे. या सीरिजचे एकूण आठ एपिसोड्स आहेत. प्रत्येक एपिसोड पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. प्रेक्षकांमध्ये या सीरिजविषयी चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे. म्हणूनच ओटीटीवर येताच ही सीरिज अनेकांसाठी ‘मस्ट वॉच’ बनली आहे. वीकेंडला तुम्हाला एखादी चांगली वेब सीरिज पहायची असेल, जी तुम्हाला पूर्ण वेळ गुंतवून ठेवेल, तर ही सीरिज आवर्जून पाहू शकता.
ज्या वेब सीरिजबद्दल आम्ही इथे बोलतोय, त्याविषयी चित्रपटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. प्रेक्षक आतुरतेने त्याच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत होते. या सीरिजची कथा इतकी भयानक आहे की तुम्ही एकटं ते पाहू शकणार नाही. कारण प्रत्येक एपिसोडमध्ये त्यातील कथेत अनेक रहस्य दडलेले आहेत. या सीरिजची कथा एका छोट्या मुलापासून सुरू होते, जो लपूनछपून थिएटरमध्ये चित्रपट पहायला पोहोचतो.
पकडले जाण्याच्या भीतीने तो तिथून पळून जातो आणि रात्रीच्या गडद अंधारात एका गाडीत जाऊन बसतो. परंतु ती गाडीच सैतानाचं आश्रयस्थान असतं, हे त्याला माहीत नसतं. त्यानंतर तो मुलगा अचानक बेपत्ता होतो आणि पिशाच बनून त्याच्या मित्रांना त्रास देऊ लागतो. या सीरिजमधील काही दृश्ये इतकी भयानक आहेत की ते पाहून भीतीचा थरकापच उडेल. हॉलिवूडची ही बहुप्रतिक्षित हॉरर थ्रिलर वेब सीरिज ‘इट- वेलकम टू डेरी’ आहे. ही सीरिज नुकतीच जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. तुम्ही ती हिंदी भाषेतही पाहू शकता.
‘इट- वेकलम टू डेरी’ या हॉरर थ्रिलर वेब सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी आठ रेटिंग मिळाली आहे. यावरूनच त्याची लोकप्रियता स्पष्ट होते. आयएमडीबीवर स्वत: प्रेक्षक एखाद्या चित्रपट किंवा वेब सीरिजला रेटिंग देतात. दहापैकी ही रेटिंग देण्यात येते.