AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : लग्नाच्या वाढदिवशीच अघटित घडलं, व्हॉट्सॲप स्टेटसमुळे तिने सर्वस्व गमावलं ! नालासोपाऱ्यात घडलं काय ?

नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना! पत्नीच्या WhatsApp स्टेटसवर अश्लील कमेंट केल्याने जाब विचारणाऱ्या पती आफताब शेखची निर्घृण हत्या करण्यात आली. लग्नाच्या वाढदिवशीच ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी मेहंदी हसन शेखने रागाच्या भरात चाकूने वार करून आफताबचा जीव घेतला. मेहंदी शेखला पोलिसांनी अटक केली असून, तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे.

Crime News : लग्नाच्या वाढदिवशीच अघटित घडलं, व्हॉट्सॲप स्टेटसमुळे तिने सर्वस्व गमावलं ! नालासोपाऱ्यात घडलं काय ?
व्हॉट्सॲप स्टेटसमुळे गमावला जीवImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Feb 28, 2026 | 8:20 AM
Share

राज्यभरात गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढलं असून कायद्याचा धाक , भीती उरली आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा घटना घडताना दिसत आहेत. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नालासोपाऱ्यात अशीच एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना घडली आहे. पत्नीचं व्हॉट्सॲप स्टेटस पाहून त्यावर अत्यंत अश्लील कमेंट आणि शिवीगाळ करणाऱ्याला जाब विचारणं तरूणाला खूपच महागात पडलं. त्याला आपला जीवच गमवावा लागला. रागाच्या भरात झालेल्या वादाचे पर्यवसन इतक्या भयानक घटनेत होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. शुक्रवारी पहाटे नालासोपाऱ्यात घडलेल्या हत्याकांडामुळे फक्त शहरच नव्हे तर अख्खी मुंबईच हादरली.आफताब शेख (24) असं मृत तरूणांच नाव असून मेहंदी हसन शेख (22) असं मारेकरी आरोपीचं नाव आहे. या भयानक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली असून सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लग्नाच्या वाढदिवशीच झाला अंत

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूण आफताब हा त्याची पत्नी शबाना ( वय 22) हिच्यासोबत नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथे रहायचा. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यामुळेच शबाबाने तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर यासंदर्भातील स्टेटस ठेवलं होतं. मात्र ते स्टेटस पाहून आरोपी मेहंदी शेख याने त्यावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दात, अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने इन्स्टाग्रामवरही शबानाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ते पाहून शबानाचा पती आपताब संतापला. पत्नीसह तो शुक्रवारी सकाळीच नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर येथे राहणाऱ्या मेहंदीच्या घरी पोहोचला.

वादाचे पर्यवसन खुनात

तेथे जाऊन त्याने मेहंदी याला याबाबात जाब विचारला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि पाहता पाहता मोठा वाद पेटला, हाणामारीही झाली. संतापाच्या भरात मेहंदी य़ाने चाकू घेऊ आफताबवर सपासप वार केले. त्याचा हल्ला, चाकूचे वार एवढे भीषण, खोलवर होते की आफताब तिथेच खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. लग्नाच्या वाढदिवशीच त्याचा दुर्दैव अंत झाला. या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोप मेहंदी हसन शेख याला बेड्या ठोकत अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेहंदी शेख हा सराईत गुन्हेगार आहे. याआधी त्याच्यावर ‘पोक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता, त्याला अटकही करण्यात आली होती. मृत आफताब आणि आरोपी मेहंदी हे आधी शेजारी शेजारी रहायचे, त्यांची आधीपासूनच ओळख होती, असंही पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...