शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी एखाद्या कंपनीच्या सीईओपेक्षाही जास्त कमावते; उत्पन्न जाणून धक्का बसेल
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी ही नेहमी त्याच्यासोबत दिसते. अनेक वर्षांपासून ती शाहरूखकडे काम करतेय. ती त्याच्या तारखा आणि त्याचा नफा-तोटा सगळं काही सांभाळते. तिच्या उत्पन्नाची रक्कम ऐकून धक्काच बसेल.

काही बॉलीवूड सुपरस्टार त्यांच्या मॅनेजर आणि बॉडीगार्डना भरघोस पगार देण्यासाठी देखील ओळखले जातात. शाहरुख खानपासून सलमान खान आणि सैफ अली खान ते अक्षय कुमारपर्यंत, ते त्यांच्या मॅनेजर आणि सुरक्षेवर खूप पैसे खर्च करतात. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीबद्दल बोलायचे झाले तर, तिचा पगार जाणून कोणालाही धक्का बसेल. पूजाचे उत्पन्न हे एखाद्या कंपनीच्या मोठ्या मालकाच्या उत्पन्नाइतके आहे. पूजा प्रत्येकवेळी शाहरुख खानसोबत असते. ती शाहरुखच्या सर्व प्रोजेक्ट्समधून मिळालेल्या सर्व पैशांचा हिशोब ठेवते आणि येणाऱ्या प्रोजेक्ट्सवरील नफा-तोटा देखील तिच पाहते.
भोवतालच्या विवादांपासून त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेपर्यंत सगळं हाताळते
बॉलिवूडमध्ये कोणीही शाहरुख खानच्या सगळ्यात जवळ असेल, तर ती म्हणजे त्याची मॅनेजर पूजा ददलानी. शाहरुख खानसारख्या मोठ्या आणि व्यस्त सुपरस्टारच्या कामाच्या शेड्यूलपासून ते त्याच्या तारखा आणि त्याच्या भोवतालच्या विवादांपासून त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेपर्यंत, पूजा ददलानी सगळं काही हाताळते. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे पूजा ददलानी.
पूजा ददलानीची एकूण संपत्ती किती आहे?
पूजा बऱ्याच वर्षांपासून शाहरुख खानच्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवत आहे. ती 2012 पासून शाहरुख खानकडे काम करत आहे आणि त्याच्या सर्व प्रोजेक्ट्सचे वेळापत्रकही तिच पाहते. ती किंग खानच्या फिल्म प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सचे काम देखील सांभाळते. याशिवाय, ती शाहरुखच्या व्यावसायिक आणि कायदेशीर बाबी देखील हाताळते. रिपोर्ट्सनुसार, पूजा एका वर्षात 7 ते 9 कोटी कमावते. तिची एकूण संपत्ती सुमारे 45 ते 50 कोटी आहे.
View this post on Instagram
लग्झरी आयुष्य जगते
पूजाचे वांद्रे येथे एक आलिशान घर आहे, ज्याचे इंटीरियर डिझाइन गौरी खान करते. 2008 मध्ये तिने हितेश गुरनानीशी लग्न केले आहे. जो ज्वेलरी ब्रँड लिस्टाचा संचालक आहे. जर तुम्ही पूजाच्या इन्स्टा वॉलवर पाहिले तर शाहरुख खानसोबत ती देखील प्रोजेक्ट टूरवर दिसेल. पूजा तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात उत्तम संतुलन राखते. शाहरुख खानच्या घरात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात पूजा देखील असते. पूजा देखील किंग खानच्या घरात प्रत्येक सण साजरा करते.
