
Girija Oak : मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या तुफान चर्चेत आली आहे. निळ्या साडीमुळे गिरिजा रातोरात नॅशनल क्रश बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गिरिजा हिचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तर गिरिजा हिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत गिरिजा हिने ब्रेकअप, लग्न आणि पहिल्या किसबद्दल सांगितलं आहे.
मुलाखतीत गिरिजा ओक हिला हृदयाला पिळवटून टाकणारं ब्रेकअप कधी झालं? असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल अभिनेत्री गिरिजा ओक म्हणाली, ‘माझं असं कधीच ब्रेकअप झालं आहे… पण माझ्यामुळे अनेकांचे हृदय पिळवटले आहे…’ पुढे स्वतःच्या लग्नाबद्दल सांगताना गिरिजा म्हणाली, ‘माझा बालविवाह झाला आहे… जवळपास 23 वर्षांची असताना माझं लग्न झालं… त्यामुळे ब्रेकअप आणि हार्टब्रेक याची कधी वेळच आली नाही आणि हे सगळं कधी करणार.’
‘फार कमी वयात लग्न झाल्यामुळे आम्ही एकत्र मोठे झालो… आपण आपल्या भावंडांसोबत मोठे होतो तसं.. एकतर फार लवकर लग्न करावं नाही तर, फार उशिरा… कारण तेव्हा आपण आपल्या मतांच्या पलीकडे गेलेलओ असतो… तेव्हा लग्न करावं…’ असं देखील गिरिजा म्हणाली.
पहिल्या किसबद्दल गिरिजा म्हणाली, ‘मला नीट आठवत नाहीये, पण मला ती फिलिंग आवडली नव्हती… तेव्हा मला जरा OK आणि ओव्हररेटेड वाटलं होतं… मी तेव्हा कॉलेजमध्ये होते… त्यानंतर काही दिवसांनी मला वाटू लागलं… मजेदार असू शकतं हे… त्यामुळे पहिला अनुभव फार काही चांगला नव्हता.. त्यामुळे पाऊस पडत होता… आम्ही एकमेकांच्या जवळ आलो… असं काहीही झालं नाही…’ असं देखील गिरिजा म्हणाली.
गिरिजा ओक हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गिरिजा ही अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. 2011 मध्ये तिने निर्माता सुहृद गोडबोलेशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. गिरिजा सध्या तुफान चर्चेत आली आहे.
गिरिजा ओक (Girija Oak Film) हिने फक्त मालिकांमध्येच नाही तर, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे… अभिनयाच्या जोरावर गिरिजा हिने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे… पण अचानक सोशल मीडियावर गिरिजा चर्चेत आली आहे. गिरिजा हिने फक्त मराठी नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील काम केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.