सारा अली खान हिचं मोठं वक्तव्य, ‘माझा बॉयफ्रेंड क्रिकेटर, उद्योजक आणि अभिनेता…’

Sara Ali Khan on Boyfriend: 'माझा बॉयफ्रेंड क्रिकेटर, उद्योजक आणि अभिनेता...', सारा अली खान हिच्या वक्तव्याने व्हाल अवाक्, सारा कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते...

सारा अली खान हिचं मोठं वक्तव्य, माझा बॉयफ्रेंड क्रिकेटर, उद्योजक आणि अभिनेता...
| Updated on: Oct 07, 2024 | 12:38 PM

Sara Ali Khan on Boyfriend: अभिनेत्री सारा अली खान हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना सारा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. सारा हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत रंगली. एवढंच नाही तर, खुद्द अभिनेत्रीने स्वतःच्या बॉयफ्रेंड आणि ब्रेकअपबद्दल अनेक खुलासे केले होते. ज्यामुळे अभिनेत्री एका रात्रीत चर्चेत आली.

सारा हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. शोमध्ये करण याने सारा हिला ‘बॉयफ्रेंड कसा हवा असा प्रश्न विचारला होता… यावर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर आजही चर्चेत आहे.

 

 

शोमध्ये करण म्हणाला होता, अभिनेता, क्रिकेटर आणि उद्योजक… तुला बॉयफ्रेंड कसा हवा आहे. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘अभिनेत्याप्रमाणे हँडसम, क्रिकेटरप्रमाणे बलवान आणि उद्योजकाप्रमाणे श्रीमंत… असा बॉयफ्रेंड मला हवा आहे…’, असं अभिनेत्रीने म्हणाली होती.

सारा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सारा हिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला देखील डेट केलं आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चांनी देखील सर्वत्र जोर धरला होता. पण अभिनेत्याच्या निधनानंतर सारा हिने सुशांत याला डेट करत असल्याचं कबुल केलं होतं.

 

 

सारा हिच्या नावाची चर्चा अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत देखील झाली होती. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट देखील केलं. ‘लव्ह आज कल 2’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला…

आता सारा हिच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती नाही… असं देखील सांगण्यात येत. अभिनेत्रीने आता स्वतःचं पूर्ण लक्ष कामात केंद्रित केलं आहे. सोशल मीडियावर सारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us