Asha Bhosle Video: शाहरुख खान याने आशा ताईंचा उष्टा चहाचा कप उचलेला तेव्हा… पाहत राहिलेला संपूर्ण देश

Shah Rukh Khan And Asha Bhosle Video : दिग्गज गायिका आशा भोसले यांचे बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेता - अभिनेत्रीसोबत चांगले संबंध राहिले आहे. अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी तर आशा ताई खास होत्या. सध्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Asha Bhosle Video: शाहरुख खान याने आशा ताईंचा उष्टा चहाचा कप उचलेला तेव्हा... पाहत राहिलेला संपूर्ण देश
गायिका आशा भोसले आणि अभिनेता शाहरुख खान
| Updated on: Apr 13, 2026 | 12:10 PM

Shah Rukh Khan And Asha Bhosle Video : अनेक दशक चाहत्यांच्या मनावर आणि संगीत विश्वावर राज्य करणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92 व्या आशा ताईंनी अखेरचा श्वास घेतला. आशा ताईंच्या निधनानंतर बॉलिवूड आणि संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशात आशा ताई यांचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता देखील आशा ताईंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आशा ताई अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत दिसत आहे… व्हिडीओमध्ये लोकांना असं काही दिसलं. ज्यामुळे सर्वत्र किंग खान याचं कौतुक होत आहे.

सांगायचं झालं तर, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2023 च्या क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यातील आहे. शाहरुख खान आणि आशा भोसले सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. ते दोघेही एकाच जागी बसले होते. या जुन्या व्हिडिओमध्ये आशा भोसले चहा पिताना दिसत आहेत. त्यांचा चहा संपल्यावर शाहरुख आपल्या जागेवरून उठतो, त्यांच्या हातातून रिकामा चहाचा कप घेतो आणि बाजूला ठेवतो.

 

 

शाहरुख खान याला असं करण्यास आशा भोसले मना करतात, पण अभिनेता काहीही ऐकत नाही… सांगायचं झालं तर, शाहरुख खान, आशा ताईंचा प्रचंड आदर करायचा आणि करतो. हे सुंदर दृश्य पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याचं कौतुक केलं… आता आशा भोसले यांचं निधन झाल्यानंतर दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे… व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला.

आशा भोसले यांना शाहरुख खान याने वाहिली श्रद्धांजली…

आशा भोसले यांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यामातून आशा ताईंना श्रद्धांजली वाहिली. आशा ताई यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत अभिनेता शोक व्यक्त करत म्हणाला, ‘आशाताईंच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं आहे. त्यांचा आवाज भारतीय चित्रपटसृष्टीच्या आधारस्तंभांपैकी एक होता आणि तो शतकानुशतके जगभर घुमत राहील. त्यांनी मला नेहमीच त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद दिले… आता मला त्यांची खूप आठवण येईल. आशाताई, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. लव्ह यू.’, अशी पोस्ट किंग खान याने केली आहे.

Follow Us