AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टीच्या लेकीची महाभयंकर चूक, भडकले नेटकरी

Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टी यांच्या लेकीची महाभयंकर चूक, पोस्ट करताना असं केलं तरी काय? प्रचंड भडकले नेटकरी..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अथिया हिच्या चुकीची चर्चा...

Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टीच्या लेकीची महाभयंकर चूक, भडकले नेटकरी
गायिका आशा भोसले
| Updated on: Apr 13, 2026 | 11:16 AM
Share

Asha Bhosale : दिग्गज अभिनेत्री आशा भोसले यांच्या निधनानंतर बॉलिवूड आणि संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.. 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा भोसले यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. पण अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्याकडून आशा ताईंचा फोटो पोस्ट करताना महाभंयकर चूक झाली आहे. अथिया हिने तात्काळ स्वतःची चूक तर सुधारली. पण तोपर्यंत उशीर झालेला. अभिनेत्रीची चूक कळताना नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.

अथिया हिने आशा भोसले यांच्या निधनानंतर श्रद्धांजली देण्यासाठी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली. पण अभिनेत्रीने चुकून दिवंगत गायिका लका मंगेशकर यांचा फोटो पोस्ट केला. लता मंगेशकर या आशा भोसले यांच्या मोठ्या बहीण आहेत आणि त्यांचं निधन 6 फेब्रुवारी 2022 मध्ये झालं. अशात, जेव्हा अथिला हिला कळलं तेव्हा अभिनेत्रीने फोटो बदलला, पण अभिनेत्रीच्या पोस्टचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अथिया हिला ट्रोल करत एक नेटकरी संतापात म्हणाला, ‘अथिया शेट्टी सुंदर आहे पण तिच्याकडे डोकंच नाही. तिने आशा भोसले यांच्या ऐवजी लता मंगेशकर याचा फोटो पोस्ट केला आहे. कोणताही संघर्ष न करता नेपो किड्सना महान बनायचं आहे… याच कारणामुळे अथियाचे सिनेमे फ्लॉप ठरले…’, दुसऱ्या नेटकऱ्यांने म्हटलं, ‘अथिया पागल झाली आहे का? चुकीचा फोटो पोस्ट केला….’, तिसरा नेटकरी अभिनेत्रीला म्हणाला, ‘फोटो पोस्ट करण्यापूर्वी एक पाहून तर घ्यायचं…’

सांगायचं झालं तर, अथिया हिने यावर कोणतंच स्पष्टीकरण दिलं नाही. पण तिने फोटो बदलून आशा ताईंना श्रद्धांजली वाहिली… सध्या अथिया हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अथिया आता बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

Follow Us
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी.
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार.
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन.
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.