tv9 Marathi Special Report | संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन
कोट्यवधी भारतीयांच्या मनावर आपल्या सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला. अवघ्या दहाव्या वर्षी, 1943 मध्ये त्यांनी मराठी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले. त्यानंतर 1948 साली ‘चुनरिया’ या हिंदी चित्रपटासाठी ‘सावन आया’ हे गाणे गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. संगीतकार आर. डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 12 हजारांहून अधिक गाणी गायली असून विविध भाषांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सात वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच 2000 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके या चित्रपट सृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राज ठाकरे, आणि उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद