AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी चाहते शोकाकुल झाले आहेत. आज शासकीय इतमामात शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. अनेक मान्यवर व चाहते अंतिम दर्शनासाठी उपस्थित आहेत, ज्यामुळे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी उसळली आहे.

Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन... चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग
आशा भोसले यांना अखेरचा निरोप
| Updated on: Apr 13, 2026 | 10:54 AM
Share

दैवी सुरांचं देणं लाभलेल्या, थोरा-मोठ्यांपासून ते लहानापर्यंत सर्वांना ज्यांच्याबद्दल निरातिशय जिव्हाळा वाटतो अशी स्वरांची देवी अर्थात ‘आशा भोसले’ (Asha Bhosle) … ठसकेबाज लावणी असो उडत्या चालीचं गीत असो किंवा ‘मेरा कुछ सामान’ सारखं अप्रतिम गीत… आपल्या गळ्यातल्या सुरांनी, आपल्या आवाजने सर्वंच गीतांना अजरामर करणाऱ्या आशा भोसलं यांचं, काल ( रविवार 12 एप्रिल) वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी सायंकाळी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, अखेर काल तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी नमूद केलं.

आशा भोसले यांच्या निधनाची बातमी येताच काल फक्त महाराष्ट्र किंवा भारत नव्हे तर त्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध झालेले, जगभरात पसरलेले त्यांचे कोट्यवधी चाहते हळहळले,  शोकाकूल झाले. अनेक राजकारणी, प्रसिद्ध व्यक्तीमत्वं, गायक, संगीतकार, सेलिब्रिटींनी विविध पोस्टद्वारे सुरांच्या या सम्राज्ञीला मानवंदना देत श्रद्धांजली वाहिली. आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आशा भोसलेचं अखेरच दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ

आशा भोसले यांच काल निधन झाल्यानंतर, आज अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव कॅसा ग्रॅंडे येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं आहे. काल मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. राज ठाकरे तसेच इतर अनेक महत्वाचे नेतेही काल अंत्यदर्शनासाठी आले होते.  तर आज बॉलिवूड क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार यांच्यासह आशा भोसले यांचे असंख चाहते, मान्यवर व्यक्ती त्यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान हाही आज सकाळी अंत्यदर्शनासाठी आला होता.

आज सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत अंत्यदर्शनाची वेळ ठेवण्यात आली असून त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची रीघ लागलेली पहायला मिळत आहे. दुपारी 3.30 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून , शिवाजी पार्क स्मशान भूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपल्या लाडक्या गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईसह संपूर्ण देशभरातून चाहत्यांचा, कलाकारांचा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू आहे. त्यांच्या राहत्या घरी सकाळपासूनच शोकाकुल वातावरण असून चाहत्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या वतीने आशा भोसले शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप दिला जाणार असून पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

अंत्यविधीसाठी तयारी

मुंबई महानगर पालिकेकडून आशाताईंच्या अंत्यविधीची तयारी झाली आहे. अंत्यविधीच्या ठिकाणी 500 पेक्षा अधिक अतिमहत्वाचे लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमीच्या आजूबाजूला LED स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तेथे LED स्क्रीन आणि साउंडवर आशाताईंचे गाणी लावून आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. 10 ते 12 हजार लोक अंत्यदर्शनाला येतील असा महानगर पालिकेचा अंदाज असून त्यानुसार तयारी करण्यात आली आहे. आशा भोसले यांचं पार्थिव शिवाजी पार्क स्मशानभूमीत आल्यानंतर थोडा वेळ अंत्यदर्शनाला ठेवण्यात येणार आहे. स्मशान भूमीत अनेक मंत्री आणि नेते अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.

असा असेल अंत्ययात्रेचा मार्ग

आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग खालीप्रमाणे असेल –

कासा ग्रँड एक्झिट गेट- डावे वळण- पेनिन्सुला सिग्नल -उजवे वळण -गणपतराव कदम मार्ग -श्रीराम नाका -वरळी नाका- उजवे वळण डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग -पोद्दार जंक्शन- ग्लॅस्को जंक्शन-सास्मिरा जंक्शन- हार्डीकर जंक्शन -सेंचुरी जंक्शन- किस्मत जंक्शन- हत्तीचा पुतळा -सिद्धिविनायक मंदिर- काशिनाथ धुरू- कीर्ती कॉलेज- सूर्यवंशी हॉल- डावी वळण-स्मशान भूमी.

Follow Us
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा भन्नाट संवाद व्हायरल!
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा