
दुर्गा पूजा सुरू झाल्यापासून,राणी मुखर्जी, काजोलचे कुटुंब सोशल मीडियावर चर्चेत आहे. काजोल आणि राणी मुखर्जी तसेच तनिषा मुखर्जी आणि या पूजेत येणारे सेलिब्रिटी देखील सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत. मुख्य म्हणजे मुखर्जी कुटुंबाच्या बहिणींच्या लूकची त्यांच्या साड्यांची चर्चा तर प्रचंड होते. राणी आणि काजोल पूजेत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या परिधान करून सर्वांना त्यांचं कौतुक करण्यास भाग पाडत आहे.
काजोलसोबत फोटो काढताना राणीने असं काही केलं….
आजही दोघींनी आपल्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकली. राणी आणि काजोलने सर्वांसोबत फोटोही काढले. त्यांनी पहिल्यांदा तनिषा मुखर्जी आणि अयान मुखर्जीसोबत फोटो काढले. नंतर राणी आणि काजोलने फोटोसाठी पोज दिल्या. पण फोटो काढताना राणीने काजोलच्या उंचीएवढी दिसण्यासाठी राणीने तिच्या टाचा उंच केल्या आणि फोटोसाठी पोज दिली. ते पाहून सर्वांना तिचं कौतुक वाटलं.
काजोलचा लूक
दुर्गापूजेच्या प्रत्येक दिवशी काजोल आणि राणीचा साडीतील सुंदर लूक दिसून येतो. नवमीला काजोलने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. साडीच्या रेशमी काठावर सोनेरी चमक दिसतेय. तसेच साडी देखील सिंपल पण सुंदर अन् डोळ्यात भरणारा लूक देत आहे. व्ही-नेकलाइनच्या ब्लाऊजमुळे काजोलचे साडीतील सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे.
सुंदर कानातले आणि हिऱ्याची अंगठी
काजोलच्या साडीच्या लूकमध्ये भर घालण्यासाठी तिने सुंदर कानातले आणि हिऱ्याची अंगठी घातली आहे.एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या बांगड्या आहेत. तिने केसांना सिंपल अंबाडा बांधून,त्यावर अर्धा गजरा लावला आहे आणि कपाळावर स्टायलिश टिकली लावून तिचा लूक पूर्ण केला आहे.
राणीचा साडीतील सुंदर लूक
राणी देखील हिरव्या रंगाची रेशमी साडी नेसून आली होती. राणीचा देसी लूक खूपच सुंदर दिसत होता. दरम्यान, राणीने तिच्या लूकला स्टाईल करण्यासाठी मोठे कानातले घातले होते. तिचे चेन कानातले आणि मोत्याचे अॅक्सेसरीज सुंदर दिसत होते. तिने बांगड्या आणि अँकलेट देखील घातले होते.भांगेत कुंकू आणि कपाळावर लाल टिकलीने किंवा बिंदीने तिने तिचा लूक पूर्ण केला होता. काजोल आणि राणी दोघीही त्यांच्या त्यांच्या लूकमध्ये फारच ग्रेसफूल दिसत होत्या.