AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

61 व्या वर्षी लगीनगाठ…आमिर खानची तिसरी पत्नी कोण? वय किती? राहते कुठे? जाणून घ्या A टू Z माहिती

Aamir Khan Marriage: बॉलिवूड सुपरस्टार आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढत आहे. 61 व्या वर्षी तो लगीनगाठ बांधत आहे. कोण आहे त्याची तिसरी पत्नी, तिचे वय किती, ती राहते कुठे? जाणून घ्या जाणून घ्या A टू Z माहिती

61 व्या वर्षी लगीनगाठ...आमिर खानची तिसरी पत्नी कोण? वय किती? राहते कुठे? जाणून घ्या A टू Z माहिती
गौरी-आमिर खानImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 05, 2026 | 10:57 PM
Share

Who Is Gauri Spratt: मिस्टर परफेक्शनिस्ट आणि लोकप्रिय अभिनेता आमिर खान हा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढत आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीचे नाव गौरी स्प्रॅट असं आहे. दोघे वर्ष 2023 पासून नात्याच्या बंधनात गुंफल्या गेले आहेत. दोघेही येत्या 5 जुलै रोजी लग्न बेडीत अडकणार आहे. लग्नाची तारीख समोर येताच दोघेही चर्चेत आले आहे. आमिर खान 61 व्या वर्षी तो लगीनगाठ बांधत आहे. कोण आहे त्याची पत्नी गौरी स्प्रॅट? ती राहते कुठे, तिचे वय किती? जाणून घ्या…

कुठे राहते गौरी स्प्रॅट?

गौरी स्प्रॅट ही बेंगळुरू शहरात राहते. ती आमिर खान याच्या पेक्षा 14 वर्षांपेक्षा लहान आहे. आमिर खान 61 वर्षांचा आहे. तर गौरी ही 47 वर्षांची आहे. तिने उटी येथील ब्लू माउंटेन शाळेतून सुरुवातीचे शिक्षण घेतले. पुढे तीने लंडन येथील युनिवर्सिटी ऑफ आर्ट्समध्ये फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. बॉलिवूडमध्ये आमिर खान या नावामागे मोठे वलय आहे. तर दुसरीकडे गौरी ही हेअर ड्रेसिंग आणि ब्युटी बिझनेसशी संबंधित आहे.

गौरीचा बंगळुरूत व्यवसाय काय?

गौरी स्प्रॅट ही बेंगळुरू येथे तिच्या आईने सुरू केलेला व्यवसाय सांभाळते. याशिवाय ती आमिर खान याची प्रोडक्शन कंपनी ‘आमिर खान प्रोडक्शन’ शी जोडल्या गेलेली आहे. आमिर आणि गौरी या दोघांची पहिली भेट जवळपास 26 वर्षांपूर्वी झाली होती. गेल्या वर्षी आमिर खानने स्वतः दोघे एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले. पण दोघांनी तीन वर्षांपूर्वी 2023 मध्ये एकमेकांना डेट करणे सुरू केले. तेव्हापासून दोघांच्या नात्यातील वीण घट्ट झाली. आता प्रेमाचे रुपांतर लग्नात होत आहे. आमिर खानचे हे तिसरे लग्न आहे.

मैत्री, प्रेम आणि आता लग्न

आमिर खान एका नातेवाईकाच्या मदतीने पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा रंगल्या. दोघांमध्ये मैत्री झाली. पण नंतर दोघे एकमेकांना ओळखत असले तरी 23 वर्षात ती केवळ मैत्री होती. त्यानंतर 2023 मध्ये दोघे एकमेकांना डेट करू लागले. गौरी स्प्रॅटचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या लग्नानंतर गौरीला एक सात वर्षांचा मुलगा आहे. आमिर खान याने गेल्या वर्षी 14 मार्च 2025 रोजी त्याच्या 60 व्या वाढदिवशी गौरीसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. तीन वर्षांनी आता हे दोघे 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन