AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रणित मोरे कोण ? सलमानही भडकला होता, ‘३७० रुपये बिर्याणी’, वादात होतेय प्रचंड टीका

Who is Pranit More: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये घडलेल्या एका प्रसंगावरुन तो वादात सापडला आहे. काय नेमका किस्सा घडला आणि प्रणित मोरे नेमका कोण ? पाहूयात..

प्रणित मोरे कोण ? सलमानही भडकला होता, '३७० रुपये बिर्याणी', वादात होतेय प्रचंड टीका
pranit more
| Updated on: Jun 11, 2026 | 8:23 PM
Share

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे हा मोठ्या वादात अकडकला आहे. त्याच्या क्राऊड-वर्क शोच्या एक ‘370 रुपये बिर्याणी’ ही क्लिप सोशल मीडियात वर प्रचंड व्हायरल झाली आणि देशभरात हंगामा झाला. ज्यात एक प्रेक्षक हिमांशु जांगडा याने त्याच्या डेटची वर्णन केल्याचे दिसत आहे. यावेळी या मुलाने असे वक्तव्य केले, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची येथेच्छ छी थू होत आहे. आणि हा शो भरवणारा प्रणित मोरे याला देखील युजर्सने टार्गेट केले आहे. चला पाहूयात कोण आहे प्रणित मोरे ?

येथे पोस्ट पाहा…

प्रणित मोरे कोण ?

स्टँडअप कॉमेडी करणारा आणि डिजिटल एन्फ्लुएन्सर आणि रेडिओ जॉकी अशी प्रतिक मोरे याची ओळख आहे. सोशल मीडियावर त्याला ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ नावाने ओळखले जाते. प्रणित मोर रियालिटी शो ‘बिग बॉस १९’ मध्ये देखील आला होता. या शोमध्ये त्याला सलमान खान याचा रागाचा सामना करावा लागला होता. ‘बिग बॉस’मध्ये सलमान खान याने प्रणितच्या ओंगळवाण्या कॉमेडीवर प्रश्न निर्माण केले होते. सलमान याने त्याला लोकांना हसवण्यासाठी तुला अश्लिल कॉमेडी का करावी लागते ? असा सवाल केला होता. सलमान खान याच्यावर प्रणित मोरे याने अश्लिल कमेंट्स केले होते.

शो बंद करुन टाका – रश्मी देसाई

‘370 रुपयांची बिर्याणी’ वादात अनेक जणांनी स्टँडअप कॉमेडीच्या दर्जावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. रश्मी देसाई यांनी ही कॉमेडी नाही, एक सामान्य बोलणे आहे. यात कोणतेही कंटेंट नाही. लोक जेव्हा असे बोलतात त्यात कंटेन्ट किंवा क्रिएटिव्हीटी नसते. प्रणित कलाकार नाही. तो कॉमेडियन देखील नाही. त्याच्या मुळे इंडस्ट्रीला विनाकारण ट्रोलिंगला सहन करावे लागत आहे. जे खरे कलाकार आहेत, त्यांच्यासाठी हे चुकीचे आहे. या मुलाने स्वत:ची नोकरी गमावली आहे. प्रणित शो देखील बंद करावेत अशीही मागणी देसाई यांनी केली आहे.

येथे पोस्ट वाचा –

‘बिर्याणी तर दमवर बनली होती’

युट्युबर एल्विश यादव याने पोस्ट केली आहे. त्याने लिहिलंय की ३७० ची बिर्याणीने गोष्ठी एक्सपोज केल्या आहेत. एक व्यक्तीला वाटले कंसेट का MRP असतो. आणि दुसरी गोष्ट ही की एका कॉमेडियनला वाटले असहज मौनाला लाफ्टर ट्रॅकपासून वाचवले जाऊ शकते. बिर्याणी तर दमवर बनली होती, वाद आणि अहंकारावर’

काय आहे संपूर्ण केस ?

हिमांशु जांगडा हा तरुण प्रणित मोरे याच्या शोमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने त्याचा डेटचा अनुभव सांगितला. त्याने चिकन बिर्याणीसाठी ३७० रुपये खर्च केले होते. जेव्हा त्या तरुणीने हिमांशु याला घरी सोडण्यास सांगितले तेव्हा त्याने आपले पैसे वसुल केल्याचे सांगितले. हिमांशु पुढे म्हणाला की मी माझ्या फिमेल फ्रेंडवर बिर्याणीसाठी ३७० रुपये खर्च केले होते. तर बदल्यात मला तिचा फिजिकली फायदा घ्यायचा होता. अशा प्रकारे त्याने हा किस्सा सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे.

प्रणित मोरे याने मागितली माफी

यावेळी हिमांशुला थांबवण्याऐवजी प्रणित मोरे यानेही त्याचे समर्थन केले आणि त्यावर अश्लिम कमेंट्स पास केले आणि सर्वजण या किश्श्यावर हसत राहिले. एवढेच नाही तर त्याने या क्लिपला आपल्या सोशल मीडिया हँडलवर देखील शेअर केले. या प्रकरणात वाद निर्माण झाल्यानंतर प्रणित मोरे याने माफी मागितली.

हिमांशुला नोकरीवरुन काढले, इंस्टाग्राम केले बंद –

हिमांशु याच्या वक्तव्यानंतर वाद इतका वाढला आणि समाजाच्या स्तरातून दोघांवर प्रचंड टीका झाली आहे. त्यामुळे हिमांशू याची नोकरी त्याला गमवावी लागली आहे. गुरुग्राम येथील डिझाईन कंपनी स्टार विक डिझाईन येथे तो वेब डेव्हलपर म्हणून काम करत होता. त्याने या वादानंतर माफी मागतली आणि त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट देखील डिएक्टीव्ह केले.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर