Sunny Deol | ‘तुम्हाला लाज वाटत नाही का…’, मुलाच्या लग्नात नातेवाईकांवर का भडकले सनी देओल?

Sunny Deol | मुलाच्या लग्नात नातेवाईकांवर का भडकले सनी देओल? अनेक दिवसांनंतर मोठं कारण अखेर समोर... सध्या सर्वत्र करण देओल याच्या लग्नाची चर्चा..

Sunny Deol | तुम्हाला लाज वाटत नाही का..., मुलाच्या लग्नात नातेवाईकांवर का भडकले सनी देओल?
| Updated on: Sep 13, 2023 | 3:52 PM

मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांचा मुलगा करण देओल याने नुकताच गर्लफ्रेंड द्रिशा अचार्य हिच्यासोबत लग्न केलं आहे. करण देओल याच्या लग्नानिमित्त संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आलं होतं. फक्त देओल कुटुंबियच नाही तर, अनेक दिग्गज कलाकार देखील करण देओल याच्या लग्नात उपस्थित होते. करण आणि द्रिशा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा विचार केला. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण लग्न सोहळा सुरु असताना सनी देओल नातेवाईकांवर भडकले होते. एका मुलाखती दरम्यान खुद्द सनी देओल यांनी घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र सनी देओल यांची चर्चा सुरु आहे.

मुलाच्या लग्नाबद्दल सनी देओल म्हणाले, ‘लग्नात आलेल्या काही नातेवाईकांवर मी भडकलो होतो. कारण त्यांनी प्रचंड त्रास दिला होता. नातेवाईक सतत व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला लाज वाटत नाही का?’ सांगायचं झालं तर, सिलेब्रिटींच्या लग्नात काही नियम असतात. सेलिब्रिटींच्या लग्नात मोबाईल फोनचा वापर करणं बंधनकारक असतं.

पुढे सनी देओल म्हणाले, ‘लग्नात नातेवाईत व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. पण माझ्या लक्षात आलं, यासाठी आपण काहीही करू शकत नाही.’ सध्या सर्वत्र सनी देओल यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर मुलाखतीत सनी देओल यांनी सोशल मीडियावरील नकारात्मकतेवर देखील मोठं वक्तव्य केलं.

सोशल मीडियाबद्दल सनी देओल म्हणाले, ‘सोशल मीडियाचा वापर करताना लोक फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात. त्यांनी ज्या शब्दांचा वापर केला आहे, त्या शब्दांमुळे कोणाचं मन दुखावू शकत याचा विचार सोशल मीडियाचा वापर करणारे करत नाहीत…’ सध्या सर्वत्र सनी देओल यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

‘पठाण’नंतर ‘गदर २’ यंदाच्या वर्षातील हिट सिनेमा

सनी देओल स्टारर ‘गदर 2’ हा २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या सिनेमाचा सीक्वल आहे. ‘गदर 2’ सिनेमात सनीसोबत अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा यांनी महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘गदर 2’ सिनेमा ‘बाहुबली’ सिनेमाचा देखील रेकॉर्ड मोडला आहे.

‘गदर 2’ हा ‘पठाण’ नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. ‘गदर 2’ सिनेमाने ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. ‘गदर 2’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली. सध्या सर्वत्र ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.