
बॉलिवूडमध्ये सोलिब्रिटी चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असतात. त्यातील अनेक कलाकारांचे अफेअर तर चित्रपटांच्या सेटवर शुटींगदरम्यानच सुरु होतात. पण त्यामागिल नेमकं कारण काय आहे? किंवा त्यावेळी कलाकारांमध्ये एवढी जवळीक का साधली जाते? यासर्वांबद्दलचा खुलासा बॉलिवूडची कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर फराह खानने केला आहे. तिने बॉलिवूडचे बरेच सिक्रेट सांगितले आहेत.
फराह खान तिच्या बिनधास्त आणि स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. तिने ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या “टू मच” शोमध्ये उपस्थिती दर्शवली होती. फराहने या शोमध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल मोकळेपणाने सांगितले. तिने असेही उघड केले की कलाकारांचे सेटवर अनेकदा अफेअर होतात. ज्याबद्दल कोणालाही माहिती नसते.
फराह खानने बॉलीवूडची गुपिते उलगडली
फराहने एक किस्सा सांगत म्हटलं की, “खरं सांगायचं तर, मी हे का केलं हे मला माहित नाही, पण मला एवढं माहिती आहे की मी एकदा असंटृच रिकामी बसून होते आणि मला बोमन इराणीचा फोन आला. संजय लीला भन्साळी माझ्या घरी आले होते आणि मला म्हणाले की तू दररोज दिवसभर सेटवर असतेस. त्यामुळे बोमन आणि फराहसोबत काम करणे परिपूर्ण होईल”
फराहने सांगितले सेटवर कलाकारांचे अफेअर का होतात?
एकदा मी अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. तेव्हा मला माहित होतं की अभिनय हा माझा आवडता व्यवसाय नाही आणि मी हे करू शकत नाही. ते माझ्यासाठी नव्हतं. मला अभिनय नीट कळत नव्हता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू फक्त सेटवर जा आणि वाट पाहा. तेव्हा मी बोमनला म्हणाले , आता मला समजलं की कलाकारांचे सेटवर अफेअर का होतात ते? कारण त्यांना बसून बसून कंटाळा येतो मग काहीतरी करायचं म्हणून अफेअर होतात” असं म्हणत फराहने बऱ्याच गोष्टी अगदी स्पष्टपणेच सांगितल्या.
दरम्यान ट्विंकल आणि काजोलच्या शोमध्ये अनेक अफेअर्सची चर्चा झाली. फराहने हे देखील कबूल केले की वयस्कर कलाकार त्यांचे अफेअर्स लपवण्यात माहिर असतात, परंतु तरुण कलाकार त्यांचे अफेअर्स लपवण्याची शक्यता कमी असते.
ट्विंकल-काजोलच्या शोमध्ये फराने लावली होती हजेरी
फराह खानचे स्वतःचे यूट्यूब चॅनेलही आहे . ज्यावर ती व्लॉग शूट करते. ती आणि तिचा शेफ दिलीप दोघेही सेलिब्रिटींच्या घरी जाऊन पदार्थ बनवतात, तसेच त्यांच्या घराची झलकही दाखवतात.या चॅनलमुळे दिलीप एका रात्रीत प्रचंड लोकप्रिय झाला, त्याचे चाहते वाढत गेले. शिवाय, दिलीपने यूट्यूबवरून इतके पैसे कमावले आहेत की तो बिहारमध्ये चार मजली घर बांधत आहे अशा बातम्याही आल्या. फराहने दिलीपचा पगार वाढवल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. चाहतेही फराहची कल्पना पसंत करत आहेत आणि तिच्या कामाचे कौतुक करत आहेत.