Saif Ali Khan : प्रचंड पैसा, आलिशान Cars, मग सैफला रिक्षातून हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ का आली?

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात प्राणघातक हल्ला झाला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सैफला ऑटो रिक्षात टाकून रुग्णालयात न्यावं लागलं. यावेळी सैफसोबत त्याचा मोठा मुलगा इब्राहिम होता. सैफ अली खान सारख्या इतक्या मोठ्या स्टारला ऑटो रिक्षातून हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ का आली? असा प्रश्न विचारला जातोय.

Saif Ali Khan : प्रचंड पैसा, आलिशान Cars, मग सैफला रिक्षातून हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ का आली?
Ibrahim ali khan-Saif Ali Khan
Follow us
| Updated on: Jan 17, 2025 | 10:56 AM

सैफ अली खानवर 16 जानेवारीला एका चोराने घरात घुसून हल्ला केला. सैफवरील हल्ल्याच्या या बातमीने त्याचे कुटुंबीयच नाही, तर मुंबईत राहणारे अन्य कलाकारही अस्वस्थ झाले आहेत. सैफ अली खानला भोसकण्यात आलं. चाकूचे अनेक वार त्याच्यावर झाले. त्यामुळे त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुद्धा झाला. त्याला तात्काळ वांद्र्याच्या लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं. आता सैफ अली खानच्या प्रकृतीला धोका नाहीय. तो रिकव्हर होतोय. आता ही माहिती समोर आलीय की, सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान रुग्णालयात घेऊन गेला. खास बाब म्हणजे इब्राहिम ऑटो रिक्षामधून वडिल सैफ यांना रुग्णालयात घेऊन गेला. आता यातून काही प्रश्न निर्माण झालेत. खान कुटुंबाकडे गाडी नव्हती का? इब्राहिमला ड्रायव्हिंग करता येत नाही का?

रिपोर्ट्नुसार रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या अब्बू सैफला, इब्राहिम ऑटो रिक्षामध्ये टाकून रुग्णालयात घेऊन आला. सैफ बरोबर ही घटना घडल्यानंतर इब्राहिमला फोन करुन बोलवण्यात आलं. असंही म्हटल जातय की, करीना कपूर त्यावेळी घरी नव्हती. करीना कपूर त्यावेळी घरी होती की नाही? या प्रश्नाच उत्तर अजून मिळालेलं नाही. करीनाच्या इन्स्टा स्टोरीवरुन तिची मैत्रिणींसोबत पार्टी सुरु असल्याचा अंदाज लावला जातोय. घरात सैफ सोबत तैमूर आणि जेह दोघे होते.

म्हणून ऑटो रिक्षा मागवली

अब्बू सैफवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच इब्राहिम लगेच तिथे पोहोचला. त्यांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली. रिपोर्ट्नुसार त्यावेळी कार तयार नव्हती, ड्रायव्हर नव्हता. म्हणून इब्राहिमने ऑटो रिक्षा मागवली व त्यात टाकून वडिलांना तो रुग्णालयात घेऊन गेला. लोक असही म्हणतायत की इब्राहिम स्वत: कार चालवून वडिलांना रुग्णालयात घेऊन जाऊ शकला असता.

ड्रायव्हिंग का नाही केली?

असं नाहीय की, सैफचा मोठा मुलगा इब्राहिमला ड्रायव्हिंग येत नाही. तो ड्रायव्हिंग करतो. अनेकदा तो पलक तिवारी सोबत दिसलाय. तो स्वत: ड्रायव्हिंग करतो. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते, तो ड्रायव्हिंग करु शकतो. कदाचित परिस्थिती पाहून त्याने त्यावेळी ड्रायव्हिंग न करण्याचा निर्णय घेतला असावा. काही असं कारण असेल की ज्यामुळे त्याला वडिलांना रिक्षामधून रुग्णालयात न्यावं लागलं.

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार.