
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर तिचे व्हॅकेशन आणि कामाशी संबंधित अपडेट्स शेअर करून तिच्या चाहत्यांशी नेहमी जोडलेली असते. फोटोमध्ये तिच्या सौंदर्याचीही खूप चर्चा होत असते. ती अनेक ब्रँड्ससोबत मिळून फोटोशूटही करत आहे. तसेच तिच्या अफेअर संबंधित अफवांमुळेही ती चर्चेत राहते. अशा परिस्थितीत, ती अभिनय क्षेत्रात प्रवेश करेल का, असा प्रश्न अनेकदा तिला विचारण्यात आला आहे. अखेर साराने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सोबतच तिला एका गोष्टीची भिती वाटत असल्याचंही तिने सांगितलं आहे.
साराने आईच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात घेतलं शिक्षण
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली सारा तेंडुलकर तिच्या वडिलांसारखी क्रिकेट क्षेत्रात आली नाही. त्याऐवजी, तिने तिची आई अंजली तेंडुलकर यांच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. सचिनची पत्नी अंजली ही बालरोगतज्ज्ञ आहे. तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून, सारानेही अभ्यासाचा तोच मार्ग निवडला आणि लंडनमधून शिक्षण घेतल्यानंतर बायोमेडिकल सायंटिस्ट बनली. ती युनायटेड किंग्डममध्ये न्यूट्रीशनिस्ट म्हणून रजिस्टर्ड देखील आहे.
अभिनय क्षेत्रात येण्याबद्दल सारा काय म्हणाली?
सारा तेंडुलकर अनेकदा ब्रँड प्रमोशन आणि मॉडेलिंग करताना दिसते. अशा परिस्थितीत, अनेक वेळा चाहते विचारत आहेत की सारा भविष्यात चित्रपटांमध्ये दिसेल का? तिने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे. तसेच या क्षेत्रात येण्यासाठी तिला कशाची भिती वाटतेही तेही सांगितले आहे. सारा म्हणाली, “मी फक्त त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते ज्या मला योग्य वाटतात, मी प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही. मला अभिनयात रस नाही. मी खूप इंट्रोवर्ट आहे आणि मला कॅमेऱ्याची खूप भीती वाटते.”
चाहत्यांची इच्छा पूर्ण होईल का?
याचा अर्थ साराच्या उत्तराने तिच्या लाखो चाहत्यांचे मन नक्कीच मोडलं आहे. जे तिला चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये पाहू इच्छित होते त्यांचा नक्कीच हिरमोड झाला आहे. पण सारा एक न्यूट्रीशनिस्ट म्हणून नक्कीच तिच्या क्षेत्रात काहीतरी चांगलं करेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.