हिरोचे वय हा अनुभव, तर हिरोईनचे वय समस्या का ? अभिनेत्री इशा कोप्पिकरचा सवाल

इशा कोप्पीकर हीने बॉलीवूडमध्ये वयासंदर्भात होणाऱ्या भेदभावावर प्रश्न केले आहेत. तिचे म्हणणे आहे की पुरुषाचे वय वाढले तर अनुभव मानला जातो तर महिलांच्या वाढत्या वयाला समस्या का मानले जात आहे.

हिरोचे वय हा अनुभव, तर हिरोईनचे वय  समस्या का ? अभिनेत्री इशा कोप्पिकरचा सवाल
Isha Koppikar
| Updated on: Jul 03, 2026 | 8:51 PM

बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने फिल्म इंडस्ट्रीतील वयोमान आणि ऑन स्क्रीन रोमान्स यात होत असलेल्या भेदभावाबद्दल आवाज उठवला आहे. तिने म्हटले आहे की जास्त वयाचे हिरो कमी वयाच्या हिरोईनशी पडद्यावर रोमान्स करतात. या असा ट्रेंड आहे ज्याला आता स्वीकारले गेले आहे. महिलांना मात्र, त्यांचे वय वाढले तर स्क्रीन वर वेगळी ओळख दाखवावी लागते.

इंस्टाग्रामवर ईशा कोप्पीकर हीने एक व्हिडियो पोस्ट केला आहे. ज्यात ती म्हणते हे एकदम अजब आहे की पुरुषांचा वय वाढले तर तो त्याचा अनुभव मानला जातो. तर एक महिलांचे वय वाढले तर ती समस्या मानली जाते. पडद्यावर आपण हिरोंना त्याच्या निम्म्या वयाच्या मुलीशीं रोमान्स करताना पाहू शकतो. ते त्यांचे हिरो बनतात. हे सर्व नॉर्मल मानले जाते.

जर एखादी महिला स्टायलिश आहे, तिची गोष्ट खुलेपणाने समोर ठेवते आणि स्वत:ची वेगळी ओळख सेसिब्रेट करते. तेव्हा मात्र तिला समजावले जाते की या वयात तुझ्या वयासारखे वाग आणि व्यवहार कर. परंतू सत्य तर हे आहे की काळासोबत एक महिला कमी नसते. ती आणखी अनुभवी होते. तिचा आत्मविश्वास गोंधळ घालत नाही.तो मजबूत होतो.त्यांचे सौदर्य केवळ त्यांच्या चेहऱ्यात नव्हे, तर तिच्या प्रवासात आहे. ती तिच्या प्रवासात दिसते. सुरुकुत्या केवळ तिचे वय दर्शवतात.ते तिचा संघर्ष दाखवतात.

येथे पाहा पोस्ट –

प्रत्येकाचे वय वाढते

तुम्ही तिच्यात हिलिंग आणि त्याच्या जीवनाचा अनुभवाला पाहू शकता. जर महिलेला जीवन मिळाले आहे, तर तिचे वय वाढेल. तुमची आई, तुमची पत्नी, तुमची बहिण, तुमची मुलगी आणि एक दिवस तुमचे स्वत:चे,  प्रत्येकाचे वय वाढते. त्यामुळे वाढत्या वयाला अपमान मानू नये. प्रत्येक वयाच्या महिलेचा सन्मान करा. तिचे वय पाहू नका. तिचा प्रवास पाहा, तिची त्वचा पाहू नका तिची ताकद पाहा. त्याला समजून घ्या. कारण कौशल्याचे कोणतीही एक्सपायरी डेट नसते आणि आत्मविश्वासाला कोणतेही वय नसते. या संदर्भात विचार करा असेही ईशा कोप्पीकर हीने म्हटले आहे.

Follow Us