Salman Khan : सलमान खानमुळे ढसाढसा रडला होता करण जोहर, ‘कुछ-कुछ होता है’ च्या सेटवर काय घडलं ?

करण जोहरने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट म्हणजे 'कुछ-कुछ होता है'. या फिल्ममध्ये सलमान खानने छोटासा कॅमिओ केला होता. मात्र शूटिंग दरम्यान सलमान एक गोष्टीवर अडून राहिला, त्याच्या हट्टामुळे करण जोहरला रडू कोसळलं होतं. काय होता तो हट्ट ?

Salman Khan : सलमान खानमुळे ढसाढसा रडला होता करण जोहर, ‘कुछ-कुछ होता है’ च्या सेटवर काय घडलं ?
| Updated on: Oct 14, 2026 | 7:31 PM

Karan Johar : फिल्ममेकर करण जोहरने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. त्याने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाद्वारे त्याच्या करिअरची सुरूवात केली. हा चित्रपट अतिशय यशस्वी जाला, हिट ठरला. या फिल्ममध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी हे तिघे प्रमुख भूमिकेत होते. तर अभिनेता सलमान खानने कॅमिओ केला होता. चित्रपटात सलमान खान अगदी थोड्या वेळासाठी दिसला तरी, त्याने त्याच्या कामाने वेगळी छाप उमटवली. अमनचं कॅरेक्टक अनेकांना आवडलं. या चित्रपटातील सगळीच गाणी गाजली, खूप लोकप्रिय झाली. याच चित्रपटाशी निगडीत एक किस्सा समोर आला आहे. सलमान खान ‘कॉफी विथ करण’च्या शेवटच्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहुणा म्हणून आला आहे. याचदरम्यान त्याचा जुना किस्सा पुन्हा चर्चेत आलाय.

चित्रपट ‘कुछ कुछ होता है’’ मध्ये सलमान काजोलसोबत ‘साजन जी घर आए’ गाण्यात दिसला होता. पण या गाण्याच्या शूटिंग दरम्यान सलमानने असा एक हट्ट केला, ज्यामुळे करण जोहर रडला होता. हो, हे खरं आहे. सलमानचा असा काय हट्टा होता, आणि कुछ कुछ होता है च्या सेटवर नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया.

Loading...

सलमानचा काय होता हट्ट ?

करण जोहरने काही वर्षांपूर्वी फॅशन डिझायनर प्रबल गुरुंगला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला की सलमानला त्या गाण्यात फाटलेली जीन्स घालायची होती. त्याचं म्हणणं होतं की आत्तापर्यंत कोणातही वर, हा फाटलेल्या जीन्समध्ये आला नसेल, आणि तसं करून त्याला एक ट्रेंड सेट करायचा होता. मात्र तेव्हा करण जोहर हा नवखा दिग्दर्शक होता. सलमानचं ते बोलणं ऐकून त्याची अवस्था बिघडली होती.

करण जोहर म्हणालाते, “आम्ही ‘साजनजी घर आले’ गाण्याचं शुटिंग करत होतो आणि सलमान तेव्हा फाटलेल्या जीन्स आणि काळ्या टी-शर्टमध्ये आला. आम्ही त्यांच्यासाठी एक सूट तयार केला होता. मी तेव्हा सलमानला खूप घाबरत होतो आणि आजही घाबरतोच”. तो पुढे म्हणाला, “ त्या वेळी सलमान मला म्हणाला की, ‘तुला माहित्ये का आत्तापर्यंत कोणताही वर फाटलेली जीन्स घालून ट्रेंड बनवू शकलेला नाही.’ ते ऐकून मी हो म्हणालो खरा, पण माझं ब्लड प्रेशर वाढतंय की काय असंच मला वाटत होतं.” असा किस्सा त्याने सांगितला.

सलमानसमोर रडला करण जोहर

करणला वाटत होतं की या गाण्यात फाटलेली जीन्स अजिबात शोभणार नाही, कारण सेट खूप भव्य होता आणि काजोलनेही सुंदर, भारी लेहंगा घातला होता. त्यामुळे त्यांनी सलमानला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सलमान ऐकायला तयार नव्हते. शेवटी, करणने एक वेगळाच मार्ग निवडला. ते म्हणाले, “ मी संकोचत त्याला नकार दिला आणि मग त्याच्यासमोरच रडायला लागलो. माझा हा पहिलाच चित्रपट आहे, कृपया सूट घाल,” अशी विनंती मी त्याला केली करणला रडताना पाहताच सलमानने लगेच आपला निर्णय बदलला आणि सूट घालायला होकार दिला. इतकंच नाही, तर सलमानने करणला शांतही केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us