
Raveena Tandon Kisses Kapil Sharma : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दर आठवड्याला कोणी ना कोणी सेलिब्रिटी येत असतात. या आठवड्यात रवीना टंडन (Raveena Tandon), गुनीत मोंगा (Guneet Monga) आणि सुधा मूर्ती (Sudha Murthy) कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. शोच्या टेलिकास्टपूर्वीच त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये प्रत्येकजण आपापल्या कथा शेअर करताना दिसत आहे. दरम्यान, रवीना टंडनने कपिल शर्माला किस (kapil sharma) केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
खरं तर, आधी रवीना टंडन कपिल शर्माची चेष्टा करते आणि नंतर उठून कपिलकडे जाते आणि त्याच्या गालावर किस करते. रवीनाची ही स्टाईल पाहून शोमध्ये सगळे हसायला लागतात. थोड्या वेळाने कपिलही हसू लागतो.
खरंतर या शोमध्ये रवीना टंडन ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाच्या वेळचे किस्से सांगत होती, काही गोष्टी शेअर करत होती. त्यावेळी ती म्हणाली की, “अंदाज अपना अपना मध्ये माझे कुरळे केस होते, मला नंतर वाटले की मी असे का केले? हे सर्व प्रश्न आपल्याला नंतर पडता, की अरे यार तेव्हा आपण असं का केलं, जरा नीट दिसायला हवं होतं.’
रवीना टंडनचं बोलून झाल्यावर कपिल शर्मा म्हणाला, “प्रत्येकालाच असं वाटतं. जुने फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात असा विचार येतो ( तेव्हा आपण असे का दिसत होतो ?)” यावर रवीना टंडन त्याची चेष्टा करत म्हणाली “तुम्हीला तर (तुमचा) सध्या फोटो पाहूनसुद्धा असंच वाटत असेल ना?” असं म्हणून ती हसली. पण पुढच्याच क्षणी ती उठून कपिल डवळ गेली आणि त्याला गालावर किस केले.
गालावर चुंबन मिळाल्यानंतर कपिल मजे-मजेत म्हणाला, ‘ असा अपमान करून हे सगळं (गालावर किस) मिळणार असेल तर तुम्ही (रवीना) अजून १-२ वेळा अपमान करू शकता की… ‘ त्याच्या या बोलण्यावर रवीासह सर्व जण हसू लागले.
कपिल शर्मा शोमध्ये दर आठवड्याला काही मोठे सेलिब्रिटी येत असतात. यावेळी रवीना टंडन शोमध्ये आली आणि तिने कार्यक्रमाची शोभा वाढवली. यात रवीना टंडन आल्याने हा शो मजेदार होणार आहे. त्याचा प्रोमोही लोकांना खूप आवडला आहे.