दुर्गा पूजा पंडालमध्ये आलिया भट्टसोबत महिलेने असं काय केलं? व्हिडीओ पाहून म्हणाल…

Alia Bhatt Viral Video: दुर्गा पूजा पंडालमध्ये महिलेने असं काय केलं ज्यामुळे बॉडीगार्ड्सना उचलावं लागलं असं पाऊल.., सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल, सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा...

दुर्गा पूजा पंडालमध्ये आलिया भट्टसोबत महिलेने असं काय केलं? व्हिडीओ पाहून म्हणाल...
फाईल फोटो
| Updated on: Oct 02, 2025 | 8:00 AM

Alia Bhatt Viral Video: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या कुटुंबाकडून आयोजित दुर्गा पूजा पंडालमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिने हजेरी लावली. पंडालमध्ये आलिया हिला मित्र आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी घेऊन आला. त्यानंतर राणी मुखर्जी हिच्यासोबत आलियाची भेट झाली. आलियाने देवीचं दर्शन घेतलं. पण पुढे असं काही झालं ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आलिया भट्ट हिचं कौतुक केलं आहे.

देवीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. आलियाचे बॉडीगार्ड्स तिला प्रोटेक्ट करत होते. पण एका लाल साडीतल्या महिलेने आलियाचा सेल्फीसाठी जोरात हात खेचला. तेव्हा आलियाचे बॉडीगार्ड्स महिलेला बाजू करत असताना आलियाने त्यांना थांबवलं आणि शांततेत परिस्थिती हाताळली..

 

 

आलियाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘असं असूनही, तिने खूप आदर आणि संयम दाखवला.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आलियाने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हे अत्यंत अनादरास्पद आहे. लोकांना त्यांच्या मर्यादा माहित असाव्यात..’

एवढंच नाही तर, एका नेटकऱ्याने यावेळी अभिनेत्री जया बच्चन बरोबर असल्याचं सांगितलं. ‘अशा वर्तनासाठी जया बच्चन योग्य आहेत…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘त्या महिलेने पाहिलं कसं केलं आणि जया बच्चन यांच्यावर आरोप करतात. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक वेळेचा सन्मान करा…’, सध्या सर्वत्र आलियाच्या व्हिडीची चर्चा रंगली आहे..

आलियाच्या सौंदर्यावर घायाळ चाहते…

आलिया भट्टच्या सौंदर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. साडीत आलियाचं सौंदर्य फुलून दिसत होतं. एक नेटकरी आलियाच्या सौंदर्याचं कौतुक करत म्हणाला, ‘आलिया प्रचंड सुंदर दिसत आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आलिया आज जेवढी सुंदर दिसत आहे तेवढीच सुंदर 5 वर्षांपूर्वी दिसत होती…’ आलिया कायम नव्या लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.