Nana Patekar: मी नाना पाटेकरलाही मारेन… ‘लगान’ फेम अभिनेत्यासोबत काय घडलं होतं?
Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेक कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. नुकताच एका कलाकाराने देखील नानांसोबत काम करताना काही अटी ठेवल्याचे सांगितले आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नाना पाटेकर यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. आता अनेक कलाकार नाना यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने देखील एक किस्सा सांगितला आहे. त्याने नानांसोबत काम करण्यापूर्वी काही अटी ठेवल्या होत्या. त्या अटी ऐकून अनेकजण चकीत झाले होते.
आम्ही बॉलिवूड अभिनेते यशपाल शर्मा यांच्याविषयी बोलत आहोत. त्यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणाले की, मला राम गोपाल वर्माच्या ऑफिसमधून फोन आला होता की यशपाल एकदा नाना पाटेकरला भेट. एक सिनेमा तयार केला जात आहे त्यात तुला कास्ट करायचे आहे. त्यांनी मला नंबर दिला आणि पत्ता दिला. मग मी गेलो. त्यांचे घर लोखंडवालामध्येच होते. त्यामुळे मी गेलो. मी गेलो तेव्हा नानांच्या हाता एक सफरचंद होते त्यांनी ते माझ्याकडे फेकले. मी ते झेलले. ते म्हणाले तू हा रोल करतोय… मी बोललो कास्ट करण्याची ही कोणती पद्धत आहे. त्यानंतर ते बसले. ते जेवत होते. मराठी लोकांचे जेवण जेवत होते. त्यांनी मला जेवणार का विचारले. पण मी सांगितले जेवून आलो आहे.
नानांसोबत काम करण्यासाठी दोन अटी
पुढे ते म्हणाले की, थोडा वेळ आमच्या गप्पा झाल्या. ते म्हणाले शिमीतला भेट. मी शिमीतकडे आलो त्याने मला एका करारावर सही करण्यास सांगितले. फक्त फॉर्म भर. मी त्यांना नकार दिला. माझ्या काही अटी आहेत. नानाच्या बाबतीत मी ऐकले आहे की तो फटाफट मारतो. मी हरियाणामधून आहे. मी सहन करणार नाही. मी नानांना डबल मारेन. नंबर दोन जर त्यांनी शिवीगाळ केली तर माझ्याकडेही प्रचंड शिव्या आहेत. मी डबल शिव्या देईन. त्यावर त्यांनी नाही नाही असे म्हटले. नाना हे पूर्णपणे बदलले आहेत.
शेवटी यशपाल म्हणाले की, के के मेननने तो एक रूमर सोडला होता की नाना रोल कट करतो. पण नानाला बराच काळ काम मिळाले नव्हते. अफताब 56च्या माध्यमातून कमबॅक केला. मी अनुभव घेतला की नाना पाटेकर हे आतापर्यंतचे सर्वात उत्कृष्ट सहकलाकार आहेत. माझा एकही सीन कट केला नाही. माझे सगळे सीन सिनेमामध्ये आहेत. फिल्मपण कमाल बनली. मला असे वाटते की कधी कधी एखाद्याला ओळखल्यानंतर तुम्हाला सत्य कळते. बाकी सगळ्या अफवा असतात. समोरासमोर तुमचे बोलणे होत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नका.