‘हा फक्त प्रेमाचा काळ…’, हनी सिंगचा गर्लफ्रेंडसोबत रोमांटिक व्हिडीओ

घटस्फोटानंतर हनी सिंगच्या आयुष्यात सुंदर तरुणीची एन्ट्री; गर्लफ्रेंडसोबत खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला

हा फक्त प्रेमाचा काळ..., हनी सिंगचा गर्लफ्रेंडसोबत रोमांटिक व्हिडीओ
'हा फक्त प्रेमाचा काळ...', हनी सिंगचा गर्लफ्रेंडसोबत रोमांटिक व्हिडीओ
| Updated on: Jan 02, 2023 | 10:58 AM

yo yo honey singh with girlfriend : नवं वर्षाचं स्वागत प्रत्येकाने मोठ्या उत्साहात केलं. सेलिब्रिटींनी देखील नव्या वर्षाचं स्वागत आपल्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तींसोबत केलं. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या New Year सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग देखील मागे राहिलेला नाही. हनीने देखील त्याच्या इन्स्टाग्रमर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हनी त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत वेळ व्यतीत करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे घटस्फोटानंतर हनीला अनेकदा या सुंदर तरुणीसोबत स्पॉट करण्यात आलं आहे.

दरम्यान, हनीसोबत दिसणारी ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून हनीची गर्लफ्रेंड असल्याचं सांगण्यात येत आहे. घटस्फोटानंतर हनीच्या आयुष्यात नव्या तरुणीची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे. ही तरुणी सुपर मॉडेल टीना थडानी (Tina Thadani) आहे. नव्या वर्षाचं स्वागत हनीने टीनासोबत केलं आहे.

हनीने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये दोघे रोमांटिक अंदाजात दिसत आहेत. व्हिडीओमध्ये हनी टीनासाठी ‘मेरी जान’ हे गाणं गाताना दिसत आहे. सध्या हनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हनीच्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. सध्या सर्वत्र गायकाच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

 

 

गर्लफ्रेंडसोबत रोमांटिक व्हिडीओ शेअर करत हनीने कॅप्शनमध्ये, ‘सर्व प्रेमीयुगलांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा… हा काळ प्रेमाचा आहे, शत्रूत्वचा नाही…’ असं म्हटलं आहे. एवढंच नाही, तर हनीने टीनाला व्हिडीओमध्ये टॅग देखील केलं आहे. सांगायचं झालं, तर अनेकदा हनी आणि टीनाला एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

हनी सिंगचं घटस्फोट
गेल्या वर्षी खासगी आयुष्यात चढ-उतार आल्यानंतर हनी आणि शालिनी तलवार विभक्त झाले. हनी आणि शालिनीने २०११ साली लग्न केलं होतं. पण हे नातं टिकू शकलं नाही. २०२२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. शालिनीने हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. घटस्फोटानंतर हनीने शालिनीला पोटगी म्हणून एक कोटी रुपये दिले.