AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी-शर्ट घातलंस, तर 2 महिन्यात नवरा घटस्फोट देईल..; पत्नीबद्दल युट्यूबरचं वादग्रस्त वक्तव्य, भडकले नेटकरी

युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या पत्नीच्या कपड्यांवरून जे वक्तव्य केलं आहे, त्यावरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये अरमान त्याची पत्नी पायलच्या कपड्यांवरून टीका करतो.

टी-शर्ट घातलंस, तर 2 महिन्यात नवरा घटस्फोट देईल..; पत्नीबद्दल युट्यूबरचं वादग्रस्त वक्तव्य, भडकले नेटकरी
युट्यूबर अरमान मलिक आणि त्याची पत्नी पायलImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2026 | 9:41 AM
Share

प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी 3’ फेम अरमान मलिक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या एका व्लॉगमधील क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्या दोन्ही पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक यांच्या कपड्यांवर चर्चा करताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये त्याने ज्या पद्धतीने पायलविषयी टिप्पणी केली, ती अनेकांना अजिबात रुचली नाही. यावरून त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अरमान पायलकडे तक्रार करतो की त्याने तिच्यासाठी नवीन नाईटी विकत घेतली, पण तरीही ती सकाळी टी-शर्ट आणि हाफ पँट घालून बाहेर आली. त्यावर पायल त्याला उत्तर देते की, ती बाळाची काळजी घेण्यात व्यस्त होती, त्यामुळे तिला तिच्या कपड्यांकडे फारसं लक्ष देता आलं नाही.

पायलचं उत्तर ऐकल्यावर अरमान म्हणतो, “मी तुझ्यासाठी रोज नवीन कपडे विकत घेणार नाही. तुझ्यावर हे कपडे कसे दिसतायत ते तरी मला दाखव, मग लोक म्हणतात की त्यांचे नवरे त्यांच्यावर प्रेम करत नाहीत. तुम्ही हाफ पँट आणि टी-शर्ट घालून फिरलात तर तुमचे नवरे तुमच्यावर कसे प्रेम करतील? तो दोन महिन्यांत तुम्हाला घटस्फोट देईल. स्वत:ला शक्य तितकं नीटनेटकं ठेवा.” अरमानचं हे वक्तव्य ऐकून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी त्याच्या मानसिकतेवर आणि विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

अरमानच्या वक्तव्यावरून नेटकऱ्यांमध्ये संताप

View this post on Instagram

A post shared by mahek🌻 (@mahek_dhameja)

‘हा नेहमी पायलची निंदा करतो आणि कृतिकाची बाजू घेतो’, असं एकाने लिहिलं. तर ‘मग प्रेम फक्त रुप आणि कपड्यांवरच अवलंबून असतं का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘त्याची विचारसरणी किती वाईट आहे, तो कसला चांगला नवरा आहे’, असं आणखी एकाने लिहिलं आहे. या सर्व गोष्टी सामान्य का मानले जात आहेत, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

कोण आहे अरमान मलिक?

अरमान मलिकचं खरं नाव संदीप आहे. तो मूळचा हरियाणातील हिसार इथला आहे. दिल्लीला येऊन कंटेंट क्रिएटर म्हणून प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी तो एका खाजगी बँकेत नोकरीला होता. त्याने पायल आणि कृतिका या दोघींशी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. आपल्या दोन्ही पत्नींसोबत तो ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सिझनमध्ये सहभागी झाला होता. हे तिघंही त्यांच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे