AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा काही तासांत होणार घटस्फोट? वकिलांकडून मोठी माहिती समोर

Yuzvendra Chahal -Dhanshree Verma divorce: हार्दिक पांड्या - नताशा यांच्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांचा होणार घटस्फोट, काही काही तासांत होणार घटस्फोट? वकिलांकडून मोठी माहिती समोर

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा काही तासांत होणार घटस्फोट? वकिलांकडून मोठी माहिती समोर
| Updated on: Feb 20, 2025 | 3:22 PM
Share

Yuzvendra Chahal -Dhanshree Verma divorce: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोर धरत आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असताना युजवेंद्र आणि धनश्री यांचा लवकरच घटस्फोट होईल अशी देखील माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटपटू आणि स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट कायदेशीररीत्या अंतिम झाला असून त्यासंबंधीच्या सर्व औपचारिकता गुरुवारी न्यायालयात पूर्ण केल्या जाणार आहेत… अशी माहिती देखील समोर येत आहे.

आज युजवेंद्र आणि धनश्रीला मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आल्याची देखील माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही गुरुवारी दुपारी 4.30 वाजता न्यायाधीशांसमोर हजर होतील आणि दोघांनाही कायदेशीर घटस्फोटाचं प्रमाणपत्र मिळेल… असं देखील सांगण्यात येत आहे.

दोघांनी परस्पर संमतीने घेतला घटस्फोटाचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. वांद्रे कोर्टात उपस्थित असलेल्या वकिलाने एका वृत्तवाहिनीला फोनवरून दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर दोघांमध्ये मतभेद आणि घटस्फोटाची चर्चा सुरू होती.

दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट देखील घटस्फोटाकडे इशारा देत आहे. धनश्रीने हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. स्ट्रेस टू बी ब्लेस्ड… अशी पोस्ट धनश्री हिने केली आहे.

एवढंच नाही तर, युजवेंद्र याने देखील स्टोरीवर एका पोस्ट शेअर केली आहे. ‘देवाने माझं अनेकदा रक्षण केलं आहे…’, असं क्रिकेटपटू म्हणाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात वाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पण ही निव्वळ चर्चाच असावी असंच चाहत्यांना वाटत होतं. कारण यावर दोघं कधीच व्यक्त झाले नाहीत. पण या वर्षाच्या सुरुवातील दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. अनफॉलो केल्यानंतर चहल आणि धनश्रीने आपल्या नात्याबाबत काहीच स्पष्ट केलं नाही. अद्यापही घटस्फोटावर दोघांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा