सलमान खानच्या कडेवर दिसणारा हा मुलगा आज प्रसिद्ध अभिनेता अन् सलमानच्या नायिकेचा नवरा, ओळखलंत का कोण?

सलमान खाना एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमानच्या कडेवर एक लहान मुलगा आहे. तो लहान मुलगा आज बॉलिवूडमध्ये नावाजलेला अभिनेता आहे. सलमानचे त्याच्याशी खास नाते असून त्याच्यासोबत सलमानचे अनेक फोटो आहेत. ओळखलंत का हा अभिनेता कोण आहे ते?

सलमान खानच्या कडेवर दिसणारा हा मुलगा आज प्रसिद्ध अभिनेता अन् सलमानच्या नायिकेचा नवरा, ओळखलंत का कोण?
salman khan
Image Credit source: instagram
| Updated on: May 31, 2025 | 12:30 PM

अनेकदा सेलिब्रिटी त्यांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. कधीकधी तर काही सेलिब्रिटींना ओळखणंही कठीण होतं. असाच एक फोटो बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननेही त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो सलमानच्या तरूणपणाचा असून त्याच्या कडेवर असलेला लहान मुलगा मात्र आता एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

सलमानच्या कडेवर असलेला लहान मुलगा आज प्रसिद्ध अभिनेता 

सलमान खानने केलेल्या पोस्टमध्ये तुम्हाला दिसत असेल की सलमानच्या कडेवर एक लहान मुलगा आहे. सलमानने स्वतः हा फोटो त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले आहे “उद्या लाँच होत आहे… उद्या पाहूया हा मुलगा आज कसा दिसतोय…”. हा मुलगा कोण आहे ते ओळखणं कठीण जात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फोटोतील हा लहान मुलगा आज नावाजलेला अभिनेता आहे शिवाय सलमान खानसोबत काम केलेल्या त्याच्या अभिनेत्रीचा पती आहे.


आताही सलमान अन् या अभिनेत्याचं आहे खास नातं

सलमान खानच्या कडेवर असलेला हा अभिनेता झहीर इक्बाल आहे. जो आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा पती आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जावई आहे. कमेंटमध्येही सर्व नेटकऱ्यांनी हेच म्हटलं आहे. तसेच सलमान खानच्या या पोस्टवर भरभरून प्रतिसाद दिला आहे. एवढंच नाही तर सलमान खानचे झहीर लहान असतानाचे त्याच्यासोबतच अनेक फोटो आहेत. एवढच नाही तर आताही सलमान आणि झहीरमधलं नातं तेवढंच खास आहे. हे अनेक पोस्टमधून समोर आलं आहे.


दरम्यान झहीर इक्बालच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, झहीर एक प्रसिद्ध अभिनेता आहे. तो नोटबुक चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. तो प्रनूतन बहलसोबत नोटबुकमध्ये दिसला.