
सध्या लोकप्रिय असलेली ‘झी मराठी’ वरील मालिका म्हणजे ‘पारू’. सध्या पारू मालिकेत बरेच रंजक वळण आलेले पाहायला मिळत आहेत. नुकताच अनुष्का आणि आदित्य यांचा साखरपुडा पार पडल्याच पाहायला मिळाल. किर्लोस्कर कुटुंबात सध्या आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या त्यांचा साखरपुडा पार पडला त्यावेळी सर्व सगळे किर्लोस्कर कुटुंबीय उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याला आणखी एक व्यक्ती हजर होती जिची कल्पनाच कोणी करू शकलं नव्हतं.
पारू मालिकेत लोकप्रिय खलनायिका
सर्वांनाच माहीत आहे की दिशा अनुष्काची लहान बहीण आहे. आता या सोहोळ्याच्या निमित्ताने मालिकेची खलनायिका एवढ्या दिवसांनंतर परतली आहे.प्रितम आणि दिशाच्या लग्नावेळी तिने केलेला फ्रॉड उघड झाल्यानंतर तिला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून तिचा जेलमध्ये असल्याचा ट्रॅक सुरू होता. मात्र, अचानक ती आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्यात अचानक एन्ट्री घेतल्याने सर्वांनाच धक्का बसतो. एवढंच नाही तर दिशा साखरपुड्यात येऊन थेट आपल्या बहिणीलाही धमकी देताना दिसली.
दिशाची धमाकेदार एन्ट्री
पण दिशाची एन्ट्री मात्र फारच धमाकेदार दाखवण्यात आली आहे. साखरपुडा सोहळ्यात दिशा केवळ आपल्या बहिणीला भेटून निघून गेली होती. मात्र आता ती 5 आलिशान गाड्या, 11 बॉडीगार्ड्स आणि बॉसी लूक करून दिशा पुन्हा एकदा मालिकेत परतली आहे.
किर्लोस्कर व्यवसायाला मोठा धोका
किर्लोस्कर उद्योगसमूहाविरुद्ध प्रतिस्पर्धी कंपनी सुरू करते. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धोका निर्माण होतो. अहिल्यादेवी चिंतेत आणि विचारात आहे की आदित्य या कठीण स्पर्धेला कसा सामोरा जाईल. तर, दुसरीकडे अनुष्का, पारू आणि आदित्यच्या नात्यातली माहिती गोळा करू लागते, पारूविरुद्ध काहीतरी सबळ पुरावा मिळवण्याचा प्रयत्न करते. पारू मात्र अनुष्काला तिच्याच पद्धतीने उत्तर देते. याशिवाय ‘पारू’ आता पुन्हा एकदा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबेसेडर सुद्धा होणार आहे.
दिशाच्या या एन्ट्रीने मालिकेत अजून रंजक वळण
दिशाच्या या एन्ट्रीने मालिकेत अजून रंजक वळण आलं आहे. आता पुन्हा एकदा अहिल्यादेवी आणि दिशा यांच्यातील नोक-झोक पाहायला मिळणार आहे. दिशा आता थेट अहिल्यादेवींनाच चॅलेंज करताना पाहायला मिळणार आहे.
दिशाला पुन्हा एकदा पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावरचा रंग उडाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता अहिल्यादेवी दिशाचे डाव हाणून पडताना यशस्वी होणार की, दिशा पारु आणि आदित्यच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे. आपल्या सख्ख्या बहिणीला सुद्धा धमकी देत असल्याचं पाहायला मिळालं.