या गाण्याशिवाय होळी पूर्ण होतच नाही, 51 वर्षांपासून सुपरहिट, ऐकताच होळीचा माहौल बदलतो

51 वर्षांपूर्वी होळीचा सण कसा साजरा झाला होता. बॉलिवूडच्या या चित्रपटातील होळीच्या गाण्याचे शूट करण्यासाठी लागले होते 10 दिवस, गाणं ठरलं होतं सुपरहिट, आजही तितकीच क्रेझ.

| Updated on: Mar 02, 2026 | 12:47 PM
1 / 5
होळीचा सण जवळ आला की रंग, गुलाल आणि जल्लोषासोबतच बॉलिवूडमधील गाणीही आठवू लागतात. हिंदी चित्रपटसृष्टीत होळीवर अनेक गाणी चित्रित झाली असली तरी 1975 साली प्रदर्शित झालेल्या Sholay या चित्रपटातील ‘होली के दिन दिल खिल जाते हैं’ हे गाणे आजही सर्वाधिक वाजवले जाते.

2 / 5

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील हे होळी गीत आजही प्रत्येक होळीच्या सणाला हमखास ऐकायला मिळते.

3 / 5

गाण्यात गावातील सर्व लोक रंगांमध्ये न्हाऊन निघालेले दिसतात. जय आणि वीरूची धमाल मस्ती, बसंतीची चंचल अदा आणि संपूर्ण गावाचा उत्साह पाहण्यासारखा असतो.

4 / 5

केवळ या एका गाण्याचे चित्रीकरण करण्यासाठी तब्बल 10 दिवसांचा कालावधी लागला होता. त्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या बारकाईने सणाचे सीन शूट केले होते.

5 / 5

‘होली के दिन दिल खिल जाते हैं’ हे गाणे आजही होळीच्या सणाचा अविभाज्य भाग आहे. रंगांच्या उत्सवात या गाण्याशिवाय जणू काही होळी अपूर्णच वाटते. ‘शोले’ हा चित्रपट आणि त्यातील हे गाणे काळाच्या ओघातही तितकेच ताजे आणि लोकप्रिय राहिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us