Festive Season Offers : दिवाळी शॉपिंगची तयारी करा सुरू ! Amazon-Flipkartवर बंपर ऑफर्स, कार्डवर 10% पर्यंत सूट

Amazon आणि Flipkartच्या फेस्टिव्ह सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर डिस्काउंट आणि बँक कार्ड ऑफर्स मिळणार आहेत. SBI, Axis Bank आणि ICICI Bankच्या पात्र कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे.

Festive Season Offers :  दिवाळी शॉपिंगची तयारी करा सुरू ! Amazon-Flipkartवर बंपर ऑफर्स, कार्डवर 10% पर्यंत सूट
FESTIVE OFFERS
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 6:31 PM

काही दिवसातंच नवरात्रीला सुरूवात होईल, मग त्यापाठोपाठ लगेच दिवाळीही येणार आहे. त्यात घराची साफसफाई आपल्यालाच करायची आहे. मग या सगळ्यात शॉपिंग करायची तरी कधी? त्यात पण काही जण म्हणतील ऑनलाईन शॉपिंग करू की, पण तुम्हाला ऑनलाईनही वस्तू काही वेळेस मार्केटपेक्षा महागात मिळते. पण आता Amezon आणि Flipcart  ग्राहकांसाठी खास फेस्टिव्ह ऑफर घेऊन आल्या आहेत. त्यामुळे ग्राहक घरबसल्या अनेक वस्तूंची खरेदी डिस्काउंटमध्ये करू शकणार आहेत.

Amezon , Flipcart च्या फेस्टिव्ह सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी बँक कार्डवर मिळणाऱ्या डिस्काउंटबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. Amezon ची ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. तर flipcart ची बिग बिलीयन डेज सेल 9 ऑक्टोबरपासून 2026 सुरू होईल.

Loading...

Amezon वर SBI कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना पात्र खरेदीवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. काही पात्र EMI व्यवहारांवरही हा फायदा लागू होणार आहे. Amezon ने आपल्या अधिकृत माहितीसाठी SBI कार्डवर 10 टक्के ऑफर जाहीर केली आहे. याशिवाय Amezon PAY शी संबंधित काही ऑफर्स आणि कॅशबॅकचे पर्यायही उपलब्ध आहेत. मात्र प्रत्येक उत्पादनावर एकसारखी ऑफर लागू असेलच अस नाही. त्यामुळे वस्तू खरेदी करण्यापूर्वी ऑफर्स व्यवस्थित तपासले पाहिजे.

Flipcart  AXIX आणि ICICI कार्डचा फायदा

Flicart च्या बिग बिलीयन डेज सेलमध्ये AXIX BANK आणि ICICI BANK च्या पात्र कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत इन्संट डिस्काउंट मिळणार आहे. Flipcart AXIX BANK को – ब्रँडेड कार्डसाठीही 10 टक्क्यांपर्यंत इन्संस्ट डिस्काउंटची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय Flipcart च्या super money सेवेमधून पाहिल्या व्यवहारावर १० टक्क्यापर्यंत कॅशबॅकची ऑफर उपलब्ध आहे. मात्र यासाठी अनेक अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.

सेल केव्हापासून सुरू होणार?

Amezon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 8 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर Flicart च्या बिग बिलीयन डेज सेल ची सुरूवात 9 ऑक्टोबरला होणार आहे. Flipcart Plus, Black/VIP आणि सदस्य आणि पात्र Flipcart क्रेडिट कार्डधारकांना 8 ऑक्टोबरपासून मिळणार आहे.

 

कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्याआधी त्या त्या संबंधित वस्तूच्या ऑफरची व्यवस्थित माहिती मिळवा आणि मगचं खरेदी करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us