AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वात मोठा दानशूर कोण? 10 श्रीमंतांमध्ये केवळ 4 जण उदार, अदानी आणि अंबानी यादीत आहेत का?

Hurun India Philanthropy List 2026: हुरून इंडिया दानशूर यादी २०२६ ची यादी समोर आली आहे. यामध्ये सर्वात मोठा दानशूर कोण? 10 श्रीमंतांमध्ये केवळ 4 जण उदार असल्याचे समोर आले आहे. अदानी आणि अंबानी यादीत आहेत का?

भारतातील सर्वात मोठा दानशूर कोण? 10 श्रीमंतांमध्ये केवळ 4 जण उदार, अदानी आणि अंबानी यादीत आहेत का?
10 श्रीमंतांमध्ये केवळ 4 जण उदार, अदानी आणि अंबानी यादीत आहेत का?
| Updated on: Nov 21, 2026 | 9:20 AM
Share

Shiv Nadar Philanthropy List 2026 : एडलगिव हरून इंडिया दानशूरांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये HCL कंपनीचे संस्थापक शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंब सलग पाचव्यांदा देशातील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये शिव नाडर आणि कुटुंबियांनी सामाजिक कार्यासाठी तब्बल 2,593 कोटी रुपये दान केले आहेत. म्हणजे रोज सरासरी त्यांनी 7.1 कोटी रुपये दान केले आहेत. या यादीत 10 श्रीमंत असले तरी दानशूरांच्या यादीत केवळ 4 जणांनाच स्थान मिळाले आहे.

दानशुराच्या यादीत कोण आघाडीवर?

हुरून इंडिया दानशुराच्या यादीतील अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत शिव नाडर यांच्या दानात 4 टक्क्यांची किरकोळ घट जाली. तरी ते पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांच्या एकूण योगदानातील 93 टक्के वाटा वैयक्तिक संपत्तीतून आला आहे. कला, संस्कृती आणि वारसा जतन करण्यासाठी त्यांनी सर्वाधिक 1220 कोटी रुपये दान केले आहेत. शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंब सलग पाचव्यांदा देशातील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत.

अदानी आणि अंबानीही यादीत

हुरून इंडियाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आणि कुटुंब आहे. अदानी यांनी जवळपास 127 टक्के अधिक दान दिले आहे. त्यांनी यंदा 877 कोटी रुपयांचे दान दिले आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर बजाज कुटुंबिय आहेत. त्यांच्या दानात 42 टक्के वाढीसह 632 कोटींच्या दानाची भर पडली आहे. तर मुकेश अंबानी यांच्या दानात एक टक्के घसरण झाली आहे. त्यांनी 620 कोटी रुपयांचे दान केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर कोरोनावरील लसीनंतर प्रसिद्धीस आलेले सायरस पुनावाला आणि अदार पुनावाल यांनी 336 कोटी, तर सुधीर मेहता आणि समीर मेहता यांनी 334 कोटी रुपयांचे योगदान दिले.

219 जण दानशूरांच्या यादीत

या यादीत एकूण 219 दानशूरांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून आर्थिक वर्ष 2026 मध्ये 11,554 कोटी रुपये दान केले आहेत. ही रक्कम गेल्या वर्षांपेक्षा 11 टक्क्यांनी अधिक आहे. यामधील टॉप 10 दानदात्यांचा वाटा 6,572 कोटी रुपये इतका आहे. महिला दानकर्त्यांची संख्या 24 वरून 29 पर्यंत वाढली आहे. रोहिणी नीलेकणी यांनी 215 कोटी रुपयांसह या यादीत सर्वाधिक दान करणाऱ्या महिलांमध्ये पहिला मान मिळवला आहे.

Follow Us
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण, CCTV फुटेज समोर
महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन...
महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन; हुतात्मा चौकात CM देवेंद्र फडणवीसांकडून अभिवादन
जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अन
Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य...
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा