
मकर संक्रांतीला इतरांपेक्षा वेगळं नाव घेयचं आहे तर पुढील उखाणे आहेत खूपच खास. तिला सारखा स्नेह गुळासारखी गोडी, .... रावाचं नाव घेते सुखी असावी जोडी

काकवी पासून बनवतात गूळ, ....रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

एका आठवड्यात दिवस असतात सात, ....नाव घेते आज आहे मकर संक्रांत

लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत, ....रावांचे नाव घेते, सुख समृद्धी येउदे आमच्या संसारात

काळ्या साडीवर शोभते, हलव्याची ठुशी, ....रावांचे नाव घेते, संक्रातीच्या दिवशी

ऊसापासून बनवतात साखर आणि गूळ,....रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटते तिळगूळ