AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मकर संक्रांती 2026

मकर संक्रांती 2026

मकर संक्रांती हा सूर्य देवतेला समर्पित असलेला खास दिवस आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, त्यालाच संक्रांती असे म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवतेच्या पूजेने सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. या दिवशी सूर्य देव दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतात. त्यामुळे रात्रीच्या तुलनेत दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होते. या दिवसापासून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो. नवीन ऋतूच्या प्रारंभाचे प्रतीक म्हणून मकर संक्रांतीचा सण ओळखला जातो. मकर संक्रांतीच्या काळात रब्बीच्या पिकांची काढणी सुरू होते. म्हणूनच शेतकरी या दिवशी देवतेचे आभार मानतात आणि चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात. मकर संक्रांतीशी संबंधित काही पौराणिकथा आहेत. एका कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णूने असुरांचा वध केला होता. तर दुसऱ्या कथेप्रमाणे, सूर्य देव आपला पुत्र शनीला भेटण्यासाठी जातात. धार्मिक मान्यतानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी देवता पृथ्वीवर येतात. या दिवशी तिळ खाणे आणि दान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि सूर्य देवतेची पूजा केल्यानंतर तिळ, गूळ, तांदूळ आणि वस्त्रांचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी तिळाचे लाडू, दही-चूडा इत्यादींचे दान करणे देखील महत्त्वाचे असते. मान्यता आहे की, मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान परत त्याच्या रूपात विस्तृत होऊन लाभ देतो. भारतातील काही भागात या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने नवग्रहाची विशेष कृपा मिळते, अशी मान्यता आहे.

Read More
मकर संक्रांतीला घ्या फक्त हे सहा उखाणे, इतर महिला तुमच्याकडे बघतच राहतील

मकर संक्रांतीला घ्या फक्त हे सहा उखाणे, इतर महिला तुमच्याकडे बघतच राहतील

मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक महिला उखाणे घेत असतात. आज आम्ही तुम्हाला असे काही उखाणे सांगणार आहोत जे ऐकून इतर महिला देखील तुमच्याकडे बघत राहितील.

संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी

संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी

मकर संक्रांतीनिमित्त नाशिकच्या गोदाघाट परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने उत्तरायणाचा प्रारंभ होतो, ज्याचे प्रतीक म्हणून संक्रांती साजरी केली जाते. रामकुंडाच्या पवित्र डोहात तीर्थ स्नानासाठी देशभरातून हजारो भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांच्या बंदोबस्तात नागरिक पतंगबाजीचा आनंदही घेत आहेत, तर निवडणुकीच्या प्रचाराची धावपळही सुरू आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिराला आकर्षण रोषणाई

परळीत असलेल्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर आणि अयप्पा स्वामी मंदिरात मकरसंक्रांतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. मकरसंक्रांतीनिमित्त वैद्यनाथाला अलंकारिक पूजा करण्यात येते. त्यातच वैद्यनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला स्नान कधी करावे, सूर्याची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या!

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला स्नान कधी करावे, सूर्याची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या!

यंदाची मकर संक्रांत अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान कधी करावे, सूर्याची पूजा कधी करावी, ते जाणून घेऊ या...

Makar Sankranti 2026 Wishes : खास मकर संक्रांतीला भन्नाट शुभेच्छा संदेश, नातेवाईकांना अशा द्या एकदम भारी शुभेच्छा!

Makar Sankranti 2026 Wishes : खास मकर संक्रांतीला भन्नाट शुभेच्छा संदेश, नातेवाईकांना अशा द्या एकदम भारी शुभेच्छा!

मकर संक्रांत या सणामुळे सगळीकडे उत्साह संचारलेला आहे. आपल्या प्रियजनांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारे हे खास संदेश वापरू शकता.

सर्व संक्रांतींमध्ये मकर संक्रांत का खास आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व

सर्व संक्रांतींमध्ये मकर संक्रांत का खास आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व

एका वर्षात १२ संक्रांती असतात. जसे की जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मेष संक्रांती म्हणतात. प्रत्येक संक्रांतीला विशेष महत्त्व असते. दोन संक्रांती विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. पण आज आपण मकर संक्रांती का खास असते त्यामागील त्याचे महत्त्व जाणून घेऊयात.

Makar Sankranti 2026 : सुगड पूजन कधी आणि कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, साहित्य आणि शास्त्रोक्त विधी

Makar Sankranti 2026 : सुगड पूजन कधी आणि कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, साहित्य आणि शास्त्रोक्त विधी

मकर संक्रांतीनिमित्त सुगड पूजनाचा शुभ मुहूर्त आणि शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या. नवीन धान्य आणि फळांनी सुगड भरून पूजा कशी करावी, याबद्दलची सविस्तर माहिती.

या संक्रांतीला खास बनवण्यासाठी 5 मिनिटांत बनवा 5 प्रकारचे पॉपकॉर्न, जाणून घ्या रेसिपी

या संक्रांतीला खास बनवण्यासाठी 5 मिनिटांत बनवा 5 प्रकारचे पॉपकॉर्न, जाणून घ्या रेसिपी

नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीला तीळाला खूप महत्त्व असते. पण यावर्षी संक्रांत सण आणखीन खास करण्यासाठी तुम्ही पाच फ्लेवर्डचे पॉपकॉर्न तयार करून हा सण साजरा करा.

ढील दे, ढील दे दे रे भैया… अमित शाह यांचा कापला की पतंग, मकर संक्रांतीची अहमदाबादमध्ये लुटला आनंद

ढील दे, ढील दे दे रे भैया… अमित शाह यांचा कापला की पतंग, मकर संक्रांतीची अहमदाबादमध्ये लुटला आनंद

Home Minister Amit Shah flies kites : मकर संक्रांतीचा जल्लोष देशभर सुरू आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा उत्साह काही औरच असतो. उत्तरायणाच्या या पर्वात देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे सुद्धा सहभागी झाले.

काळी पैठणी, हलव्याचे दागिने.. पूजा सावंतची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत

काळी पैठणी, हलव्याचे दागिने.. पूजा सावंतची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत

काळी पैठणी, हलव्याचे दागिने.. पूजा सावंतची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत | Pooja Sawant first Makar Sankranti celebration in australia black paithani and halvyache dagine

Makarsankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण…

Makarsankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण…

मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक भगांमध्ये अगदी उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांतीला अनेक भागांमध्ये खिचडीचे नैवेद्य देखील केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र मोठी होऊ लागते. विशेष गोष्ट म्हणजे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जाते. चला तर जाणून घेऊया या दिवशी काळ्या कपड्यांचे महत्त्व काय?

मकर संक्रांतीच्या दिवशी ‘हे’ काम करायला विसरू नका, होऊ शकतं मोठं नुकसान

मकर संक्रांतीच्या दिवशी ‘हे’ काम करायला विसरू नका, होऊ शकतं मोठं नुकसान

अनेकदा आपण सणाच्या दिवशी किंवा कोणत्याही शुभ दिवशी अशा काही चुका करतो. ज्याचा परिणाम तुमच्यावर किंवा तुमच्या कामांवर होत असतो. तसेच या चुकांमुळे तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये.