AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makar Sankranti 2026 Wishes : खास मकर संक्रांतीला भन्नाट शुभेच्छा संदेश, नातेवाईकांना अशा द्या एकदम भारी शुभेच्छा!

मकर संक्रांत या सणामुळे सगळीकडे उत्साह संचारलेला आहे. आपल्या प्रियजनांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारे हे खास संदेश वापरू शकता.

Makar Sankranti 2026 Wishes : खास मकर संक्रांतीला भन्नाट शुभेच्छा संदेश, नातेवाईकांना अशा द्या एकदम भारी शुभेच्छा!
makar sankranti wishes in marathi Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 13, 2026 | 9:02 PM
Share

हिंदू धर्मात मकर संक्रांतीली खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी तिळगुळ देऊन सर्व राग, लोभ, द्वेश विसरून गोड गोड बोलण्याचे आवाहन केले जाते. विशेष म्हणजे दोन व्यक्तींमधील नातं हे चांगलं असावं म्हणूनही जुनी नाराजी विसरून पुढे जाण्यासाठीही आजच्या दिवशी संकल्प केला जातो. त्यामुळे आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील शुभेच्छा संदेश वापरू शकता. विशेष म्हणजे तुम्ही हे संदेश वापरून तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता..

1) पतंगासोबत उंचावो तुमच्या स्वप्नांचा ध्यास, आनंद, आरोग्य आणि यश लाभो खास. मकर संक्रांतीच्या प्रेमळ शुभेच्छा!

2) जुनी दुःखं मागे टाकून, नवी आशा घेऊन या, गोड गोड तिळगुळासारखा आनंद जीवनात राहू द्या. मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

3) सूर्यदेव देओ तेज, उर्जा आणि नवी दिशा, तुमचं आयुष्य उजळो, हीच एक इच्छा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

4) उबदार सूर्यकिरणांनी उजळो प्रत्येक सकाळ, तिळगुळासारखा गोड राहो जीवनाचा काळ. मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

5) नव्या ऋतूच्या या गोड सणात, आशा, विश्वास आणि प्रेम लाभो प्रत्येक क्षणात. मकर संक्रांतीच्या प्रेमळ शुभेच्छा!

6) सूर्याच्या तेजासोबत वाढो तुमची प्रगती, जीवनात सदैव राहो सुख, शांती आणि समृद्धी. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

7) जुनी वेदना विसरून, नवी उमेद मनात जपूया, सूर्याच्या साक्षीने आयुष्य नव्याने घडवूया. मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

8) तिळगुळाच्या गोडव्याइतकं गोड असो नात्यांचं बंधन, प्रत्येक क्षणी लाभो समाधान आणि आपुलकीचं स्पंदन. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

9) सूर्य उत्तरायणाला, जीवन सुखद वळणाला, समृद्धी, शांती नांदो तुमच्या अंगणाला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

10) मनात साठलेल्या चिंता हळूच दूर जाऊ दे, या सणासोबत आनंद आणि समाधान नवे येऊ दे. मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा

11) सूर्य जसा रोज उगवतो नव्या आशेने, तसंच तुमचं आयुष्य फुलो नव्या स्वप्नांनी आणि प्रेमाने. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

12) शब्द कमी पडतात कधी भावना सांगायला, तिळगुळासारख्या गोड आठवणी राहोत आयुष्यभर जपायला. मकर संक्रांतीच्या प्रेमळ शुभेच्छा

सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.