सर्व संक्रांतींमध्ये मकर संक्रांत का खास आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व
एका वर्षात १२ संक्रांती असतात. जसे की जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मेष संक्रांती म्हणतात. प्रत्येक संक्रांतीला विशेष महत्त्व असते. दोन संक्रांती विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. पण आज आपण मकर संक्रांती का खास असते त्यामागील त्याचे महत्त्व जाणून घेऊयात.

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य कोणत्याही राशीतून भ्रमण करतो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. सूर्य दर महिन्याला राशी बदलत असतो. मेष ते मीन राशीपर्यंत एकूण 12 राशी आहेत. अशावेळेस एका वर्षात 12 संक्रांती येतात. जसे की जर सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तर त्याला मेष संक्रांती म्हणतात, जर तो कर्क राशीत प्रवेश करतो तर त्याला कर्क संक्रांती म्हणतात. प्रत्येक संक्रांतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते. परंतु या संक्रांतीपैकी दोन संक्रांती खूप महत्वाच्या मानल्या जातात. पहिली मकर संक्रांती आणि दुसरी कर्क संक्रांती. परंतु प्रश्न असा आहे की सर्व संक्रांतींमध्ये मकर संक्रांती विशेष का आहे? चला तर मग आजच्या लेखात आपण मकर संक्रांत खास का असते याबद्दल जाणून घेऊयात.
सूर्य देवतेची पूजा:
जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात. असे मानले जाते की मकर संक्रांती अग्नि तत्वाची सुरुवात दर्शवते. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. या दिवसात सूर्यदेव उत्तरायणातही प्रवेश करतात. हे दिवस जप, स्नान आणि दान करण्यासाठी सर्वात विशेष मानले जातात. देवतांसाठी देखील मकर संक्रांत हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी सूर्याची पूजा करण्यासोबतच सूर्या देवतेला नैवेद्य दाखवला जातो.
2026 मध्ये मकर संक्रांत कधी आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये सूर्य दुपारी मकर राशीत संक्रमण करेल. म्हणून 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाईल. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीसाठी स्नान आणि दान केले जाईल. महापुण्य शुभ वेळ दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी ते 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत असेल आणि पुण्य काळ दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी ते 5 वाजून 46 मिनिटांपर्यंत असेल. सूर्य उत्तरेकडे सरकताच खरमास संपेल.
मकर संक्रांतीचे महत्त्व
आता प्रश्न असा आहे की मकर संक्रांती इतकी महत्त्वाची का आहे? ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीला शनीची रास म्हटली जाते. अशा वेळेस सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करत असताना तो शनीच्या राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे हा सण सूर्य आणि शनीच्या राशीशी संबंधित मानला जातो म्हणूनच या सणाचे महत्त्व आणखी वाढते. मान्यतेनुसार सूर्य हा दिवसाच्या शक्तीचा स्वामी आहे, तर शनि हा रात्रीच्या शक्तीचा स्वामी आहे. हेच कारण आहे की जेव्हा दोघेही एकमेकांच्या प्रभावाखाली येतील तेव्हा विशेष परिणाम दिसून येतील. तसेच खरमास या दिवशी संपतो.
मकर राशीवर न्याय आणि कर्माचे देवता शनिदेव राज्य करतात आणि तो सूर्यदेवाचा पुत्र आहे. याचा अर्थ शनिदेव आणि सूर्यदेव यांच्यात पिता- पुत्राचे नाते आहे आणि पुढील महिन्यासाठी सूर्यदेव त्यांचा मुलगा शनिदेव यांच्या घरी मकर राशीत वास करतात. यामुळे मकर संक्रांती आणखी महत्त्वाची बनते.
