AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pola Date 2023 : यंदा किती तारखेला साजरा होणार बैल पोळा? या सणाला हे नाव कसे कसे पडले?

भारत, जिथे शेती हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे आणि बहुतेक शेतकरी शेतीसाठी बैलांचा वापर करतात. त्यामुळे प्राण्यांची पूजा आणि आभार मानण्यासाठी शेतकरी हा सण साजरा करतात.

Pola Date 2023 : यंदा किती तारखेला साजरा होणार बैल पोळा? या सणाला हे नाव कसे कसे पडले?
पोळाImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 07, 2023 | 6:12 PM
Share

मुंबई : भारत हा कृषिप्रधान देश आहे, इथे बैलांचे शेती उत्तम करण्यात विशेष योगदान आहे. त्यामुळे भारतात बैलांचे पूजा केली जाते. पोळा (Pola 2023) हा सण अशा दिवसांपैकी एक आहे ज्या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची पूजा करतात. पोळा हा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो, याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. तो ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येतो. यंदा पोळा 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आपल्याकडे हा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो.  बैल पोळ्याला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो.

या सणाला पोळा हे नाव कसे पडले?

भगवान विष्णू कान्हाच्या रूपात पृथ्वीवर आले तेव्हा ती कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. त्याचा मामा कंस जन्मापासूनच त्याचा शत्रू होता. कृष्ण तरुण असताना वसुदेव-यशोदेच्या घरी राहत होता तेव्हा कंसाने त्याला मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवले होते. एकदा कंसाने पोलासुर नावाच्या राक्षसाला पाठवले होते, त्याच्या लीलेमुळे त्यालाही कृष्णाने मारले होते, आणि सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तो दिवस श्रावण महिन्यातील अमावास्येचा दिवस होता, या दिवसापासून त्याला पोळा असे नाव पडले.

असे आहे या सणाचे महत्त्व

भारत, जिथे शेती हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे आणि बहुतेक शेतकरी शेतीसाठी बैलांचा वापर करतात. त्यामुळे प्राण्यांची पूजा आणि आभार मानण्यासाठी शेतकरी हा सण साजरा करतात. पोळा हा सण मोठा पोळा आणि छोटा पोळा अशा दोन प्रकारे साजरा केला जातो. मोठ्या पोळ्यामध्ये बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते, तर लहान पोळ्यामध्ये मुलं खेळण्यातील बैल शेजारच्या घरोघरी घेऊन जातात आणि नंतर त्यांना काही पैसे किंवा भेटवस्तू दिली जातात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता