Gadchiroli Pola : कोरचीत दुसऱ्या दिवशी बैल पोळ्याचा सण उत्साहात, शहरातील नागरिकांमध्ये गोंधळ

त्यांना विविध रंगांनी व विविध प्रकारचे बाशिंग घालून सजावट केली. मरारटोली येथे एकत्र आणले होते. यावेळी कार्यक्रमाची महापूजा राकेश मोहुर्ले यांच्याकडून करून पोळा फोडण्यात आला.

Gadchiroli Pola : कोरचीत दुसऱ्या दिवशी बैल पोळ्याचा सण उत्साहात, शहरातील नागरिकांमध्ये गोंधळ
कोरचीत दुसऱ्या दिवशी बैल पोळ्याचा सण उत्साहातImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 10:28 PM

गडचिरोली : शेतकरी (Farmer) पोळ्याचा सण हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो. परंतु मागील दोन वर्षे संपूर्ण देशात कोरोनाचा थैमान असल्याने पोळा हा सण शेतकऱ्यांना पाहिजे तसा उत्साहात साजरा करता आला नाही. दोन वर्षांनंतर आतुरतेने वाट बघत यावर्षी नागरिकांनी पोळा सण साजरा करण्यासाठी आशा लावली होती. मात्र पोळ्याच्या दिवशी पोळा न होता दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्याला बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात आला. दुसरीकडे ग्रामीण भागातील ( Rural Area) काही गावांमध्ये पोळ्याच्या दिवशीच लोकांनी बैलांची पूजा करून बैलजोडींना (Bullock Pair) एकत्र करून लोकांच्या घरी नेले. नागरिकांनी बैलांना नैवेद्य घालून उपास सोडून पोळा सण उत्साहात साजरा केला. परंतु कोरची शहरातील पोळ्याच्या दिवशी 26 ऑगस्टला शुक्रवारी बैलांचा पोळा भरविण्यात आलाच नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाले होते.

बाशिंग बांधले, महापूजा केली

कोरची तालुका हा छत्तीसगडला लागून असल्याने बहुतांश सण हे बाबूलाल चतुर्वेदी कालनिर्णयाप्रमाणे करण्यात येतात. यावेळी गावातील ज्येष्ठ, प्रतिष्ठितांनी लोकांनी सभा ठेवून बैलपोळा सण दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्टला शनिवारी मरारटोली येथे मोठ्या उत्साहाने भरविण्यात आला होता. येथील शेतकरी आपल्या बैल मित्रांना शेतीच्या कामाला नेले नाही. बैलांना चांगल्या प्रकारे आंघोळ घातली. त्यांना विविध रंगांनी व विविध प्रकारचे बाशिंग घालून सजावट केली. मरारटोली येथे एकत्र आणले होते. यावेळी कार्यक्रमाची महापूजा राकेश मोहुर्ले यांच्याकडून करून पोळा फोडण्यात आला.

135 बैलजोड्या सहभागी

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बैलांची पैज स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 135 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये गौरी चौकातील प्रथम योगेश जमकातन तर द्वितीय मुकेश जमकातन यांनी बैलजोळी पैजमध्ये बाजी मारली. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्याला अकराशे रुपये तर द्वितीय येणाऱ्याला सातशे रुपये बक्षीस ठेवण्यात आले. सदर पोळ्याचे नियोजन माळी समाज व गावातील प्रतिष्ठित गावकरी मंडळी मिळून करण्यात आले. यशस्वीतेसाठी मनोज अग्रवाल, नगरपंचायत उपमुख्यधिकारी बाबासो हाके, संतोष मोहुर्ले, श्रीहरी मोहुर्ले, विनोद गुरनुले, केशव मोहुर्ले यांनी सहकार्य केले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.