स्पेशल रिपोर्ट: 1 युती आणि 100 सवाल!

मुंबई: सत्तेत असणारे मित्रच एकमेकांना तुफान हल्लाबोल करत होते. पण 18 फेब्रुवारीचा दिवस शिवसेना आणि भाजपच्या आयुष्यात नव्या किरणाप्रमाणे आला आणि युतीचा शंखनाद झाला. पण युती झाली असली तरी चर्चा काही थांबताना दिसत नाही. कारण अॅक्शननंतर रिअॅक्शनही येतेच आणि असंच काहीसं युतीच्या बाबतीत झालं आहे. युती झाली पण माईंडगेम सुरुच आहेत. शिवसेना-भाजप नेत्यांचं एकमेकांविरोधातलं बंड […]

स्पेशल रिपोर्ट: 1 युती आणि 100 सवाल!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई: सत्तेत असणारे मित्रच एकमेकांना तुफान हल्लाबोल करत होते. पण 18 फेब्रुवारीचा दिवस शिवसेना आणि भाजपच्या आयुष्यात नव्या किरणाप्रमाणे आला आणि युतीचा शंखनाद झाला. पण युती झाली असली तरी चर्चा काही थांबताना दिसत नाही. कारण अॅक्शननंतर रिअॅक्शनही येतेच आणि असंच काहीसं युतीच्या बाबतीत झालं आहे. युती झाली पण माईंडगेम सुरुच आहेत. शिवसेना-भाजप नेत्यांचं एकमेकांविरोधातलं बंड कायम आहे. जालन्यात अर्जुन खोतकर यांनी तर रावसाहेब दानवेंविरोधात उघड उघड शड्डू ठोकला आहे.

वाचा: युती झाली तरी बेहत्तर, दानवेंना विरोध कायम: अर्जुन खोतकर  

ज्या तावातावानं युती झाली, त्याच वेगानं आता सवाल उपस्थित झाले आहेत. युतीचा फायदा कोणाला? गटबाजी वाढणार? बंडाळी वाढणार? मुख्यमंत्रीपदाचं काय? कट्टर शिवसैनिकांना युती आवडली का? भाजपची मजबुरी?सर्व्हेमुळं युती? याच सवालांवरुन आता कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरु आहे.

सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे की युतीचा फायदा कोणाला ?…शिवसेनेला की भाजपला.

लोकसभेसाठी भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढणार आहे. विधानसभेसाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला असला तरी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

वाचा: युतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेच्या या तीन अटी भाजपकडून मान्य 

युतीच्या घोषणेआधी शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्र लढण्याची तयारी केलीच होती. त्यामुळं ज्या संभावित उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते, त्याठिकाणी युतीमुळं पत्ता कट होणार असेल तर बंडाळी तर वाढणारच.

वाचा: शिवसेना-भाजपच्या युतीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना आणि भाजपमध्ये बऱ्याच नेत्यांचा युतीला विरोधच होता. आता युतीमुळं पक्षांमध्येच दोन गट पडून गटबाजीचीही दाट शक्यता आहेच. त्यातच उघड उघड असकार्य सुरु झालं आहे. कारण त्याच शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी दानवेंविरोधात लढणारच असल्याचं म्हटलं. तर सिंधुदुर्गात विनायक राऊतांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं.

म्हणजेच युती झाली असली तरी खरी परीक्षा आता सुरु झाली आहे.

एकहाती सत्तेची घोषणा तर शिवसेनेबरोबरच भाजपनंही केली होती.पण सध्याची स्थिती तशी नाही.  म्हणूनच दोन्ही नेतृत्वांना एकमेकांच्या शेजारी बसण्याची वेळ आलीच. आता युतीच्याच सामन्यात कोण जिंकणार ? हे निवडणुकीतच कळेल.

… तर भाजपने युती तोडावी: रामदास कदम

दुसरीकडे युतीमध्ये नैतिकता असल्याचं मत रामदास कदमांनी व्यक्त केलं आहे.  नैतिकता मान्य नसेल तर भाजपने युती तोडावी असं वक्तव्य रामदास कदमांनी केलं. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री असा निर्णय झाला आहे. हा निर्णय मान्य नसेल तर युती तोडावी असंही रामदास कदमांनी जाहीरपणे सांगितलं. चोरांच्या हातात चावी जाऊ नये म्हणून आम्ही युतीचा निर्णय घेतला असा टोलाही त्यांनी आघाडीला लगवाला आहे.

संबंधित बातम्या 

युती झाली तरी बेहत्तर, दानवेंना विरोध कायम: अर्जुन खोतकर  

शिवसेना- भाजपची युती, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण?  

शिवसेना-भाजपच्या युतीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया  

युतीच्या घोषणेपूर्वीच विरोधकांचे ट्वीटवर ट्वीट  

युतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेच्या या तीन अटी भाजपकडून मान्य  

 युती झाली, लोकसभेसाठी शिवसेना 23, भाजप 25, विधानसभा 50-50

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.