AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: युती झाली, लोकसभेसाठी शिवसेना 23, भाजप 25, विधानसभा 50-50

मुंबई: शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करत भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजपची युती जाहीर केली. या पत्रकार परिषदेत “आगामी निवडणुकांसाठी फॉर्म्युलेही जाहीर करण्यात आले. शिवसेना-भाजप आगामी सर्व निवडणुका एकत्र लढेल. लोकसभा निवडुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेना 23 तर भाजप 25 […]

LIVE: युती झाली, लोकसभेसाठी शिवसेना 23, भाजप 25, विधानसभा 50-50
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM
Share

मुंबई: शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करत भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजपची युती जाहीर केली. या पत्रकार परिषदेत “आगामी निवडणुकांसाठी फॉर्म्युलेही जाहीर करण्यात आले. शिवसेना-भाजप आगामी सर्व निवडणुका एकत्र लढेल. लोकसभा निवडुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढेल. तर विधानसभेसाठी मित्रपक्षांशी चर्चा करुन जागा निश्चित केल्या जातील, ज्या जागा उरतील त्या दोन्ही पक्ष म्हणजेच शिवसेना-भाजप 50-50 टक्के जागा लढतील”, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

वरळीतील ब्लू सी या हॉटेलमध्ये शिवसेना-भाजपची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीवर भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेसाठी वरळीतील हॉटेलवर आले. या पत्रकार परिषदेला शिवसेना-भाजपचे सर्व दिग्गज नेते, कॅबिनेट मंत्रिमंडळ उपस्थित होतं.

युतीबाबत तीन महत्त्वाचे मुद्दे

  1. लोकसभा निवडणुकीतील जागा –  शिवसेना 23 जागा,  भाजप – 25 जागा लढणार
  2. विधानसभा – दोन्ही पक्ष अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार
  3. शिवसेनेची नाणारची मागणी मान्य, नाणार प्रकल्प हलवणार

वाचा: युतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेच्या या तीन अटी भाजपकडून मान्य

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विविध मुद्द्यांवर एकमत झाल्यामुळे आपण युतीसाठी एकत्रित आलो असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शेतकरी कर्जमाफीसंबंधी प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी लाभापासून वंचित असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय रिफायनरी प्रकल्प आणि इतर मागण्यांबाबतही शिवसेना-भाजपात एकमत झालं आहे. आपण गेली 50 वर्ष ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांनाच आपल्या भांडणाचा फायदा होऊ नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अमित शाह काय म्हणाले?

कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मनातली भावना पूर्ण झाली असल्याचं सांगत अमित शाहांनी युतीचं स्वागत केलं. महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेसाठीही चार महिन्यात निवडणूक आहे. त्यामुळे जबाबदारी आणि जागाही निम्म्या वाटून घेणार असल्याचं अमित शाहांनी जाहीर केलं.

दुपारी सव्वाचारच्या सुमारास अमित शाह मुंबईत दाखल झाले. उद्धव ठाकरेंना भेटण्यापूर्वी अमित शाह भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. दुसरीकडे शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव, आदित्य आणि अमित शाह -मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेला रवाना झाले.

2014 मध्ये कोण किती जागा लढलं?

2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने 48 जागांपैकी 42 जागा जिंकल्या होत्या. 2014 ला भाजपने काही जागा मित्रपक्षांनाही सोडल्या होत्या. पण यावेळी ही युती फक्त शिवसेना आणि भाजप यांचीच आहे.

2014 मध्ये शिवसेना 20 जागा लढली होती, त्यापैकी 18 जागा जिंकल्या.  तर भाजपने 24 जागा लढवून 23 जागा जिंकल्या होत्या.

वाचा: सध्या कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार?

LIVE UPDATE

पत्रकार परिषद

मुख्यमंत्री –

शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढेल, भजापच्या वाट्याला 25 जागा

विधानसभेबाबत मित्रपक्षांशी चर्चा करु, त्यानंतर उरतील त्या जागा शिवसेना-भाजप अर्ध्या अर्ध्या लढेल

आम्ही राज्यामध्ये युतीचं सरकार एकत्र चालवत आहोत. राष्ट्रीय हितासाठी पक्ष एकत्र यायला पाहिजेत. 

विधानसभा, लोकसभासह सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला.

आमच्या काही विषयावर मतभेद, परंतु विचार एक आहे.

शेतक-यांना कर्जमाफी दिली. काही शेतक-यांना तांत्रिक बाबीमुळे कर्जमाफी मिळाली नाही, या संदर्भात त्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी पुन्हा प्रयत्न केला जाईल. पीकविम्याचा प्रश्न मार्गी लावणार

राम मंदिरासाठी दोन्ही पक्ष आग्रही

काही जणांना आमची युती नको वाटत होती, मात्र आम्ही 25 वर्षांपासून एकत्र

संपूर्ण पत्रकार परिषद VIDEO:

युतीबाबत दिवसभरात काय झालं?

दुपारी सव्वाचार वाजता भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबई विमानतळावर दाखल झाले. तिथे भाजप नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजनांसह कार्यकर्त्यांनी अमित शाहांचं स्वागत केलं.

यांनतर अमित शाहांसह सर्व नेते वांद्र्यातील सोफिटल हॉटेलवर गेले. इथे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत अमित शाहांनी बैठक घेतली. जवळपास दोन तास ही बैठक चालली.

त्याच दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी येथील ब्लू सी हॉटेलवर जाऊन पाहणी केली. याच हॉटेलवर उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची पत्रकार परिषद आयोजित होती.

एकीकडे भाजपची बैठक सुरु होती, तर दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेना नेत्यांचीही खलबतं सुरु होती. शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, गजानन कीर्तीकर यांच्यासह दिग्गज नेते मातोश्रीवर हजर होते

अमित शाह यांनी जवळपास दोन तास चर्चा केल्यानंतर साडेसहाच्या सुमारास ते मातोश्रीवर दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाहांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांशी तासभर चर्चा केली

उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यातील बैठक साडेसात वाजता संपली, जवळपास 50 मिनिटे ‘मातोश्री’वर खलबतं चालली

संध्याकाळी 7.35 मिनिटांनी मुख्यमंत्री, अमित शाह, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले

संध्याकाळी 7.50 च्या सुमारास वरळीतील ब्लू सी या हॉटेलवर शिवसेना-भाजपच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली.

शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढेल, भजापच्या वाट्याला 25 जागा, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

विधानसभेबाबत मित्रपक्षांशी चर्चा करु, त्यानंतर उरतील त्या जागा शिवसेना-भाजप अर्ध्या अर्ध्या लढेल

LIVE UPDATE

  • शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढेल, भजापच्या वाट्याला 25 जागा, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
  • जवळपास 50 मिनिटांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री, अमित शाह, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेसाठी रवाना
  • उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यातील बैठक साडेसात वाजता संपली, जवळपास 50 मिनिटे ‘मातोश्री’वर खलबतं चालली
  • अमित शाह मातोश्रीवर दाखल
  • अमित शाह सोफिटल हॉटेलमध्ये दाखल, भाजप नेत्यांसोबत बैठक
  • मनोहर जोशी, संजय राऊत मातेश्रीवर दाखल.
  • उद्धव ठाकरेंना भेटण्यापूर्वी अमित शाह भाजप नेत्यांसोबत बैठक घेणार, या बैठकीला अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार
  • अमित शाह मुंबईत दाखल
  • अमित शाह थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार

युतीसाठी शिवसेनेच्या अटी काय आहेत?

1) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदार संघ देणार. त्यामुळे महाराष्ट्रातील 48 पैकी शिवसेना 23 तर भाजप 25 जागांवर उमेदवार उभे करणार.

2) विधानसभा निवडणुकीत 288 पैकी शिवसेना 144 आणि भाजप 144 असा फिफ्टी-फिफ्टी फाॅर्मुला असेल.

3) शिवसेनेनं ही युती फक्त भाजपशी केलेली आहे. भाजपच्या मित्रपक्षांशी नाही.

4) त्यामुळे भाजपच्या 144 जागांपैकी त्यांना मित्र पक्षांसाठी किमान 20 जागा सोडाव्या लागतील.

5) भाजपच्या मित्र पक्षांच्या जागेवर शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार.

6) त्यामुळे विधानसभेत शिवसेना 164 पर्यंत उमेदवार उभे करु शकते.

7) युतीतील जागावाटपांबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही शिवसेनेनं आग्रही भूमिका ठेवली आहे. युती करताना ही प्रमुख अट ही ठेवण्यात आली होती.

8) शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादित पीकांना हमीभाव आणि दुष्काळग्रस्त गावांत तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या