सुदानमध्ये भाकरीसाठी आंदोलन, 19 जणांचा मृत्यू

खार्टूम (सुदान) : सुदान देशात भाकरीच्या वाढत्या दराविरोधात नागरिकांनी निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरली आहेत. या निदर्शनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीत 19 जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास 219 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. सुदान हा उत्तर आफ्रिकेतील देश आहे. आफ्रिका खंडातील आणि अरब जगतातील …

सुदानमध्ये भाकरीसाठी आंदोलन, 19 जणांचा मृत्यू

खार्टूम (सुदान) : सुदान देशात भाकरीच्या वाढत्या दराविरोधात नागरिकांनी निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरली आहेत. या निदर्शनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीत 19 जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास 219 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे.

सुदान हा उत्तर आफ्रिकेतील देश आहे. आफ्रिका खंडातील आणि अरब जगतातील सर्वात मोठा देश म्हणून सुदानची ओळख आहे. खार्टूम ही सुदानची राजधानी आहे.

सुदान सध्या परकीय चलनाच्या भयंकर तुटवड्याला सामोरं जातो आहे. मोठ्या आर्थिक संकटात सुदान देश अडकला आहे. कैकपटीने महागाई वाढली आहे. आधीच अव्वाच्या सव्वा महागाई वाढली असताना, पोटा-पाण्याचा प्रश्न तीव्र होऊ लगाला आहे. देश संकटात आणणाऱ्या सुदानच्या राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरु लागली आहे.

जोपर्यंत आपल्या मागण्या होत नाहीत, तोपर्यंत आपलं आंदोलन सरु ठेवा, असे आवाहन सुदानीज कम्युनिस्ट पार्टीने काल आहे. मात्र, या आवाहनानंतर सुदान पोलिसांनी कम्युनिस्ट पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

सुदानमध्ये आधीच डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप केला आहे. त्यात आता सुदानवासियांनीही अन्नासाठी निदर्शनं सुरु केल्याने देशात मोठी खळबळ माजली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *