‘माझ्या नादी लागू नको’, अजित पवार निलेश लंके यांच्यावर प्रचंड संतापले, भर सभेत दिला इशारा

निलेश लंकेंच्या शहरात अजित पवारांनी तुफान बॅटिंग केलीय. भर पावसात झालेल्या सभेत अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर टीकास्त्र डागलं. विशेष म्हणजे अचानक आलेल्या पावसातही नागरिकांनी सभेला मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली.

'माझ्या नादी लागू नको', अजित पवार निलेश लंके यांच्यावर प्रचंड संतापले, भर सभेत दिला इशारा
निलेश लंके आणि अजित पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 5:52 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पारनेर येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर सडकून टीका केली. “चुकीची माणसं दिले तर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त होते. लोक म्हणतात आम्ही तुम्हाला पाहून मतदान दिलं. नको त्या माणसाला निवडून दिलं. गेल्या आमदारकीला माझीसुद्धा चूक झाली. त्यावेळी तुमच्यातलेच अनेक जण माझ्याकडे आले होते. दादा निलेश ला द्या. दादा निलेशला द्या म्हणत होते. तुमच्यासाठी उमेदवारी दिली. मात्र वाटलं नव्हतं बाबा असे दिवे लावेल. गडी दिसायला बारीक दिसतो. मात्र लय पोहोचलेला आहे. मला त्यावेळी घरी घेऊन गेला. कसं साधं घर आहे, कसे आई-वडील हे सांगितलं. आमदार झाल्यावर त्याची एक-एक लक्षणं कळायला लागली”, असा दावा अजित पवार यांनी केला.

“अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो. आणि हा पट्ट्या ए कलेक्टर.. पोलिसांनाही मी तुमचा बाप येतोय अशी धमकी देतो. अरे निलेश, बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्यामागे लागलो तर आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे, कंड जिरवतो. तुझा असा कंड जिरवेल की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल”, असा इशारा अजित पवारांनी निलेश लंके यांना दिला.

‘माझ्या नादी लागू नको’, अजित पवारांचा इशारा

“माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू तर किस झाड की पत्ती? मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे. आचारसंहिता संपल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेईन. आता तर तो आमदारही नाहीये. तो तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस झालाय. त्यामुळे त्याची अरेरावी आता अधिकाऱ्यांनी सहन करू नका. आपल्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करू नका. मात्र कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका”, असं अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

‘कोणी दहशतीत असेल तर त्याला जाऊन सांगा…’

“निवडणूक आयोगाला सुद्धा पारनेरमध्ये जास्त बंदोबस्त देण्याची आम्ही मागणी करणार आहोत. इथे प्रत्येक व्यावसायिकाला आणि डॉक्टरला बिल न घेण्यासाठी दादागिरी केली जाते हे सुद्धा मला समजलं. तुम्ही अजिबात घाबरू नका. महायुती आता तुमच्या पाठीशी आहे. या लोकसभा निवडणुकीत या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. अजूनही कोणी दहशतीत असेल तर त्याला जाऊन सांगा… अजित पवार आला होता आणि तो आपल्या पाठीशी आहे”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

“आपल्या आमदाराने राजीनामा दिला आता कोण वाली? हे समजू नका. पालकमंत्री विखे आता आपल्या सोबतच आहेत. महाराष्ट्राला दाखवून द्या हा फुगा होता. इथले नगराध्यक्ष मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हणालो इतके दिवस गप्प का? आधी बोलले असते तर आधीच बंदोबस्त केला असता. गडी पुरता वाया गेलाय. आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही. 4 जूनला पेट्या उघडल्यावर हे लंकेचं पार्सल घरी पाठवण्याचं काम करा”, असं अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.