मीरा-भाईंदर महापौर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नगरसेविका बेपत्ता

मीरा-भाईंदरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नगरसेविका बेपत्ता (Congress corporator missing Mira Bhayandar) झाल्याचा आरोप आहे. 

मीरा-भाईंदर महापौर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नगरसेविका बेपत्ता

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नगरसेविका बेपत्ता (Congress corporator missing Mira Bhayandar) झाल्याचा आरोप आहे.  नगरसेविका बेपत्ता झाल्याने मीरा-भाईंदर परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. काँग्रेस नगरसेविका सारा अक्रम आणि त्यांचे पती मिराज अक्रम हे बेपत्ता आहेत. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेविकेचे अपहरण केल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालसुरे यांनी केला (Congress corporator missing Mira Bhayandar) आहे.

नगरसेविका 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास बेपत्ता आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपहरण केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

या दोन्ही पती-पत्नीशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या घरचे आणि नातेवाईकही अत्यंत चिंताग्रस्त झाले आहेत. मालुसरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रारही दाखल केली आहे.

दरम्यान, मीरा-भाईंदरमध्ये महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकांवरुन राजकारण चांगलेच तापले आहेत. या निवडणुकीला आता काही तासांचा अवधी राहिलेला आहे आणि या महापौर निवडणुकीमध्ये राजकीय घडामोडी झपाट्याने वाढत आहेत. सध्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *