मुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण, खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील

बृहन्मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील 147 ठिकाणे सील (Corona Mumbai 147 place seal) करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण, खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील 147 ठिकाणे सील (Corona Mumbai 147 place seal) करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होम क्वारंटाईमधील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खासगी इमारती आणि जहाजे ताब्यात घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

मुंबईत आज (31 मार्च) कोरोनाचे नव्या 59 रुग्णांची नोंद (Corona Mumbai 147 place seal) झाली. तर सोमवारी 47 रुग्ण सापडले. या रुग्णांमध्ये 6 एप्रिलपर्यंत अशाचप्रकारे वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे झोपडपट्ट्या आणि चाळींमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या 147 वस्त्या, गृहसंकुले महापालिकेने सील केली आहेत. त्यात वरळी कोळीवाडा, गोरेगाव येथील बिंबिसार नगर अशा मोठ्या वसाहतींचाही समावेश आहे.

कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आणि कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाही सक्तीने 14 दिवस एकांतात राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र घरे लहान असलेल्या व्यक्तींना एकांतात राहणे शक्‍य नसते. अशा व्यक्तींच्या होम क्वारंटाईनसाठी खासगी इमारती आणि जहाजे ताब्यात घेतली जाणार आहे. नुकतंच महापालिका आयुक्त परदेशी यांनी याबाबतचे आदेश प्रभागातील सहायक आयुक्तांना दिले. त्यांना प्राथमिक सोईसुविधा पुरवण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.

होम क्वारंटाईनसाठी हॉटेल, वसतिगृहे, लॉज, धर्मशाळा, मंगल कार्यालये, सभागृहे, रिकाम्या इमारती, जिमखाना, संस्था, जहाजे (क्रूझ), महाविद्यालये, क्‍लब इत्यादी इमारती महापालिका ताब्यात घेणार आहे.

मुंबईत 23 मार्चला परदेशातून शेवटचे विमान आले. त्याला 6 एप्रिलला 14 दिवस होतील. त्यामुळे महापालिकेने युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे. सोडियम हायपोक्‍लोराईटचा वापर निकषांनुसार करणे गरजेचे आहे. अतिरिक्त वापर झाल्यास अपाय होऊ शकतो. त्यामुळे खासगी संस्थांनी निर्जंतुकीकरण करू नये, असा निर्णय यावेळी घेण्यात  (Corona Mumbai 147 place seal)आला.

असे होणार निर्जंतुकीकरण

  • कोरोना रुग्ण किंवा होम क्वारंटाईनमधील व्यक्तीच्या गृहसंकुल परिसरात आठवड्यातून एकदा.
  • कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात दररोज.
  • इतर सार्वजनिक रुग्णालये, दवाखाने, हेल्थ पोस्ट, विभाग कार्यालयांचे आठवड्यातून एकदा.
जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई434923741417
पुणे (शहर+ग्रामीण)7961938356
पिंपरी चिंचवड मनपा5023411
ठाणे (शहर+ग्रामीण)
50523693
नवी मुंबई मनपा30018074
कल्याण डोंबिवली मनपा14449127
उल्हासनगर मनपा4069
भिवंडी निजामपूर मनपा199117
मिरा भाईंदर मनपा76315730
पालघर 17113
वसई विरार मनपा102810531
रायगड673526
पनवेल मनपा56525
नाशिक (शहर +ग्रामीण)473210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)165368
धुळे17720
जळगाव 781174
नंदूरबार 374
सोलापूर10324185
सातारा564322
कोल्हापूर 60726
सांगली126294
सिंधुदुर्ग7820
रत्नागिरी31425
औरंगाबाद16531484
जालना1542
हिंगोली 19310
परभणी731
लातूर 12583
उस्मानाबाद 9132
बीड491
नांदेड 1356
अकोला 6471433
अमरावती 26116
यवतमाळ 148221
बुलडाणा 7483
वाशिम 80
नागपूर6358411
वर्धा 901
भंडारा3700
गोंदिया 6610
चंद्रपूर2710
गडचिरोली3900
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)63018
एकूण74860323292587
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *