खडंणीखोर 'बाळराजे' अखेर ताब्यात

उस्मानाबाद : राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच्या फोटोंचा गैरवापर करुन, लोकांना फसवणारा आणि लोकांकडून खडणी वसूल करणारा खंडणीखोर ‘बाळराजे’ अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. उस्मानाबाद पोलिसांनी या खंडणीखोरावर कारवाई केली असून, या बाळराजेला मदत करणारी महिला आरोपी अद्याप फरार आहे. उस्मानाबाद येथील उद्योजक देवदत्त मोरे यांची पत्नी अर्चना मोरे यांच्याकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या श्रीकृष्ण …

खडंणीखोर 'बाळराजे' अखेर ताब्यात

उस्मानाबाद : राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच्या फोटोंचा गैरवापर करुन, लोकांना फसवणारा आणि लोकांकडून खडणी वसूल करणारा खंडणीखोर ‘बाळराजे’ अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. उस्मानाबाद पोलिसांनी या खंडणीखोरावर कारवाई केली असून, या बाळराजेला मदत करणारी महिला आरोपी अद्याप फरार आहे.

उस्मानाबाद येथील उद्योजक देवदत्त मोरे यांची पत्नी अर्चना मोरे यांच्याकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या श्रीकृष्ण उर्फ बाळराजे तौर-पाटील याला आनंदनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. बाळराजे या नावाने ओळखला जाणारा हा आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील असून तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थानिक गाव पुढारी आहे.

बाळराजे याने महाराष्ट्रातील अनेक लोकांना विविध राजकीय नेत्यांच्या, प्रशासकीय अधिकारी यांच्या नावाचा गैरवापर करीत करोडो रुपयांना फसवले आहे. मोठ्या नेत्यांसोबत असलेले फोटो दाखवून तो छाप पाडायचा व नंतर पैसे लुटायचा.

नेमकं काय घडलं?

देवदत्त मोरे हे उस्मानाबाद येथील कसबे तडवळा येथील उद्योजक आहेत. त्यांच्या पत्नीला म्हणजे अर्चना मोरे यांना या बाळराजेने धमकी दिली आणि हे बाळराजाचे कारनामे उघडकीस आले.

“देवदत्त मोरे यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार आली असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले आहे, मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले असून खंडणी न दिल्यास तुमच्या पतीला भुजबळांसारखे जेलमध्ये टाकू” अशी धमकी बाळराजेने अर्चना मोरे यांना दिली.

अर्चना मोरे यांना फसवण्यासाठी बाळराजेने रेखा भालशंकर या महिलेची मदत घेतली होती. या रेखा भालशंकरने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करुन, आपण देवदत्त मोरेंची पत्नी आसल्याचा दावा केला होता. शिवाय, मोरे कुटुंबीयांनी दत्तक घेतलेल्या मुलीवरही रेखाने आरोप केले होते.

याच फेसबुक पोस्टचा आधार घेत बाळराजेने अर्चना मोरे यांच्याकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली होती. मुख्यमंत्र्यांकडून चौकशी, महिला आयोगाकडून चौकशी, सीबीआयकडून चौकशी अशा चौकशांच्या धमक्याही बाळराजे देत होता.

अखेर यासंदर्भात अर्चना मोरेंनी पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांनी सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला. बाळराजेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, रेखा भालशंकर सध्या फरार आहे. पोलिस तिचाही शोध घेत असून, तिलाही लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *